नागपूर : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत असा गंभीर आरोप भाजपाचे नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकाआघाडीच्या मंत्र्यांवर केला आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व प्रकारचे अवैध धंदे सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाला हाताशी धरून वाळूचोरी, तस्करी या प्रकारचे धंदे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अवैध व्यवसायांसाठी जिल्हे वाटून घेतले आहेत. असा धक्कादाय आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
तर, रेती वाहतूक करणाऱ्या गाड्या अ़डवायच्या नाहीत, असा एसपी आणि कलेक्टरांना अलिखित आदेश देण्यात आलेला आहे. आमचे कार्यकर्ते बिनधास्त गाड्या चालवतील, असा कारभार चालला आहे. सर्वांनी जिल्हे वाटून घेतले आहेत. अवैध दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामधून मोठी कमाई केली जात आहे, असा खळबळजनक आरोप बावनकुळे यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- ‘या खोटारड्या उर्जामंत्र्यांवर हक्कभंग आणणार…’
- ‘चेन्नईने आता धोनीचा नाद सोडून द्यावा…’
- ऑस्ट्रेलियात सुनील शेट्टीच्या कन्नेला मिस करतोय के. एल. राहुल!
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो बायडेन यांना फोन, ‘या’ विषयावर झाली चर्चा !
- ‘अनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल’ !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
