Share

पवारांचा दौरा रद्द झाल्यानंतर एकनाथ खडसेंचे मोठे विधान…

Published On: 

मुंबई : एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप पक्षाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंत्तर महाराष्ट्रात भाजपला नुकसान सहन करावे लागणार अशा चर्चा सध्या चालू आहेत. खडसे यांच्या पक्षांतरानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार होते. मात्र, शरद पवार यांचा हा दौरा रद्द झाला आशे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे क्वारंटाईन असल्याने खबरदारी म्हणून हा दौरा रद्द केला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी केली जात होती. मात्र हा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार येत्या २० आणि २१ नोव्हेंबरला धुळ्यासह नंदूरबारला जाणार होते. यावेळी ते त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांशी संवाद साधणार होते. शरद पवारांच्या दौऱ्यानिमित्ताने राष्ट्रवादी पक्षाकडून जय्यत तयारीलाही सुरुवात करण्यात आली होती. विशेष म्हणजे खडसेंच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीकडून हा पहिलाच जाहीर दौरा आयोजित केला होता. शरद पवारांच्या या दौऱ्यासाठी खास नियोजनही करण्यात आले होते. मात्र हा दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.

दरम्यान, हा दौरा रद्द होताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं, मात्र आता यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एकनाथ खडसे यांनी दौरा रद्द होण्यामागील कारण सांगितले आहे. नाथाभाऊ म्हणाले दौरा रद्द नाही तर स्थगित झाला आहे. तर ‘शरद पवार २० आणि २१ नोव्हेंबर रोजी उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार येथे शेतकरी मेळावा आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थित राहणार होते. मात्र शरद पवारांच्या दौऱ्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने परवानगी देण्यास नकार दिला. मोठ्या प्रमाणात गर्दी होणं अडचणीचं ठरलं असतं. यामुळेच दौरा रद्द नाही तर स्थगित करण्यात आला आहे’. अस एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!