Share

भाजपला धक्का देत केंद्रीय मंत्रिपद भूषविलेला नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश ?

Published On: 

औरंगाबाद : एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर भाजपचे अनेक नेते व पदाधिकारी बाहेर पडतील, असे बोलले जात होते. आता खडसेंनंतर आणखी एका ज्येष्ठ नेत्याने भाजपला धक्का दिला आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

गायकवाड हे बीड लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच, मराठवाडा पदवीधर मतदारसंघातूनही त्यांनी दोनदा बाजी मारली होती. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्रिपद भूषवले होते. तसेच, केंद्रात शिक्षण व खाण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली होती.

गायकवाड हे सध्या भाजपच्या प्रदेश कार्यसमितीचे सदस्य होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते सक्रिय राजकारणातून बाजूला फेकले गेले होते. संघाच्या मुशीतून घडलेले जयसिंगराव गायकवाड हे जनसंघापासून भाजपमध्ये कार्यरत होते. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत त्यांनी मराठवाड्यात पक्षाच्या विस्तारासाठी काम केले होते. आता होऊ घातलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मराठवाडा विभागातून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सर्वात जात इनकमिंग राष्ट्रवादीत सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा आकडा वाढतच आहे. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे मराठवाड्यात राष्ट्रवादीची मराठवाड्यातील ताकत वाढेल अशी देखील शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर गायकवाड यांनी आपली व्यथा मांडली. ‘पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. मागच्या १३ वर्षांपासून मला कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही. पक्षात मागूनही काम मिळत नाही,’ अशी व्यथा त्यांनी मांडली. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत आताच काही सांगणार नाही. आता मला भाजपला पाडायचं आहे. उद्यापासून सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी मराठवाडा दौरा सुरू करणार आहे.’

भाजप हा पक्ष सध्या हवेत गेला आहे. ते सध्या विमानापेक्षाही जास्त उंचीवर आहेत. मात्र, आता मी भाजपला धडा शिकवणार आहे, त्यासाठी भाजपने तयार राहावे, असा इशारा जयसिंगराव गायकवाड यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!