Share

दिलासादायक : कोरोनाची लस 94.5 टक्के यशस्वी असल्याचा अमेरिकन कंपनी मॉर्डनाचा दावा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- रशियाची कोरोनावरील लस स्पुतनिक 5 नंतर आता अमेरिकेतील मॉर्डना इंक कंपनीनेही जीवघेण्या कोरोना व्हायरसवरील प्रभावी लस तयार केल्याचा दावा केला आहे. मॉर्डनाने दावा केला आहे की, त्यांनी तयार केलेलं कोरोना वॅक्सिन संसर्गापासून बचाव करण्यासाठी 94.5 टक्के प्रभावी असल्याचं निष्पन्न झालं आहे.

मॉडर्ना या अमेरिकेतील औषध उत्पादक कंपनीने विकसित करत असलेली कोरोना लस तिसऱ्या आणि शेवटच्या चाचणीमध्ये ९४.५ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला. मॉडर्ना कंपनी अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मदतीने ही लस विकसित करत आहे.

या लसीची ३० हजार लोकांवर चाचणी घेण्यात येत आहे. ही लस खोलीतील सामान्य वातावरणात देखील १२ तास सुरक्षित राहिल असही सांगण्यात येत आहे.यापूर्वी फायझर या कंपनीने कोरोनावरील लस 90 टक्के परिणामकारक असल्याचा दावा केला होता. या कंपनीनंतर आता मॉडर्ना या अजून एका अमेरिकन बायोटेक कंपनीने त्यांची लस 95 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे.

या लसींच्या संशोधनात मेसेंजर आरएनए या मॉलिक्युलच्या सिन्थेटिक प्रकाराचा वापर करण्यात आला आहे. हा प्रकार शरीराच्या रोगप्रतिकारक क्षमतेला विषाणूवरील प्रथिनांचे आवरण हटवून त्या विषाणूचा सामना करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करण्याचं काम करतो.

या लसीच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी घेण्यात आली असून त्यात 30 हजार स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. कोरोनाची लागण झालेल्या या स्वयंसेवकांना लस टोचल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याची नोंद करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!