Share

‘लागिरं झालं जी’ या मालिकेमध्ये ‘जीजी’ची भूमिका गाजवणाऱ्या जेष्ठअभिनेत्री कमल ठोके यांचं दुःखद निधन

Published On: 

मुंबई : ‘लागिरं झालं जी’ या मालिकेमध्ये ‘जीजी’ची भूमिका गाजवणाऱ्या अभिनेत्री कमल ठोके यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे मालिकेतल्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. कमल ठोके यांचं शनिवारी निधन झालं. कमल ठोके यांना कॅन्सर झाला होता.

कमल ठोके यांनी या आधी काही मराठी चित्रपटातदेखील भूमिका साकारल्या आहेत. ना. मुख्यमंत्री गावडे, सख्खा भाऊ पक्का वैरी, बाबा लगीन, वरड, माहेरचा आहेर या चित्रपटामध्ये त्यांनी अतिशय उत्तम भूमिका साकारल्या. कमल ठोके काही दिवसांपासून बंगळुरुला आपल्या मुलाकडे रहायला गेल्या होत्या. त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते.

‘लागीरं झालं जी’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. याच मालिकेमधून कमल ठोके यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. जीजी यांचे निधन झाल्याने मालिकेतील कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. मराठी सिनेसृष्टीत जीजी अशी कमल ठोके यांची ओळख आहे. त्यांच्या जाण्याने चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!