Share

व्यर्थ न जाओ बलिदान : अवघ्या वीसाव्या वर्षी भारत मातेसाठी जीवन केले अर्पण!

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : दिवाळी उत्साहाने पण योग्य खबरदारी घेऊन साजरा होईल अशी भावना प्रत्येक नागरिक करत असतानाच पाकिस्तानने पुन्हा आपले नापाक इरादे पूर्ण करण्यासाठी कुरापती सुरु केल्या आहेत. भारतात कोणताही सण आला की काही ना काही ग्रहण लावायच्या तयारीत शत्रू राष्ट्र असतात. त्यामुळेच त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य देखील सज्ज असतं. गेले काही दिवस जम्मू-काश्मीरच्या सीमेवर गोळीबार करून भारतीय लष्कराची खोड काढून घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या पाकड्यांना जवानांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

माञ, पाकिस्तानने काल (दि. १३) रोजी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. यात महाराष्ट्रातील २ वीरपुत्रांचा देखील समावेश असून अवघ्या 20 वर्षांचे भारतमातेचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे शहीद झाले आहेत.

पाक सैन्याकडून शुक्रवारी पहाटेपासूनच वारंवार शस्त्रीसंधीचं उल्लंघन केलं जात होतं. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला उत्तर देताना ऋषिकेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराठी हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दावाखान्यात नेत असताना त्यांचं निधन झालं. ते मूळचे कोल्हापूरमधील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या गावचे होते. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच अवघा कोल्हापूर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. ते एकुलते एक होते.

तर, जोंधळे यांच्यासह महाराष्ट्राच्या आणखी एका जवानाला वीरमरण आलं आहे. पाकिस्तानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील भूषण सताई हे जवान शहीद झाले आहेत. भूषण सताई हे श्रीनगरच्या गुरेज सेक्टरमध्ये तैनात होते. पाकिस्तानने शुक्रवारी शस्त्रसंधीचं उल्लंघन करून भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!