🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सोनगाव ता.राहुरी शाखेतील सोनेतारण केलेल्या १९१ पैकी तब्बल १३४ कर्जदारांचे सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कर्ज वसुलीचे सोन्याचे दागिने बनावट आढळले आहे.
बनावट सोने गहाण ठेवलेल्या १३४ कर्जदार व सोनगाव शाखेचा सुवर्णपारखी (सराफ) यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १९१ पैकी ५७ कर्जदारांनी सोन्याचे दागिने सोडविल्याने बँकेची सुमारे ५० लाख रुपयांची वसुली झाली आहे.
जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयातील व्यवस्थापक राजेंद्र शेळके यांच्या अधिपत्याखाली सोनगाव ता.राहुरी शाखेतील सोनेतारण दागिन्यांची सत्यता पडताळणी नुकतीच पूर्ण झाली. बँकेने नियुक्त केलेल्या सुवर्णपारखी (सराफ) यांनी १९१ कर्जदारांच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी केली.
त्यात १३४ कर्जदारांचे सोने बनावट आढळले. ५७ जणांनी कर्ज व व्याजाची रक्कम भरून, दागिने सोडवून घेतले. त्यांच्या दागिन्यांची सत्यता पडताळणी करण्यात आली नाही. कर्जदारांच्या अनुपस्थितीत पंचांसमक्ष दागिन्यांची तपासणी करण्यात आली. दागिन्यांच्या सत्यता पडताळणीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सोनगाव-सात्रळ परिसरातील काही प्रतिष्ठित पसार झाले आहेत.
बनावट सोने गहाण ठेवलेल्या १३४ कर्जदार व सोनगाव शाखेचा सुवर्णपारखी यांच्यावर बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या चार-पाच दिवसात गुन्हे दाखल केले जातील, असे जिल्हा सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटील यांनी फक्त सरकार पडण्याची स्वप्न पहावीत; थोरातांचा चंद्रकांत पाटलांना टोला!
- लढा सुरूच : बिहारमध्ये सत्ता महागठबंधनचीच येणार; तेजस्वी यादवांनी व्यक्त केला विश्वास
- तिकडे ट्रम्प हरले मात्र इकडं मोदी जिंकलेच – रावसाहेब दानवे
- ‘शरद पवार यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल’
- “राहुल गांधी विद्यार्थ्यांना प्रभावित करण्यास उत्सुक आहेत, पण त्यांची योग्यता नाही.”- बराक ओबामा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

