🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजतील असं सूचक विधान भाजपा खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. “लवकरच महाराष्ट्रात सरकारचे फटाके वाजतील. यांना काहीच जमत नाही त्यामुळे ती वेळ लवकरच येईल. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत फटाके वाजणार. तो काढायला गेलं तर फार वेळ लागेल, त्यामुळे वेळ आल्यावर तोदेखील समोर आणू,” असं नारायण राणे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.
यानंतर, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी नारायण राणेंवर पलटवार केला आहे. “ नारायण राणे दुःखी आत्मा आहेत. त्यांची विक्रम-वेताळसारखी अवस्था झाली आहे. टीव्हीवर जसं एका जाहिरातीत ‘धुंडते रह जाओगे’ असं म्हटलंय तसेच पुरावे त्यांच्याजवळ आहेत” अशी बोचरी टीका गोऱ्हे यांनी केली आहे.
नारायण राणे यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत. राणे यांनी 12 डिसेंबरपर्यंत त्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा माफी मागावी, असा इशारा देखील नीलम गोऱ्हे यांनी दिला आहे. “मुख्यमंत्रीदाला शोभणारं एकही काम केलेलं नाही. पिंजऱ्यातून हात धुवा आणि अंतर ठेवा याच्यापलीकडे मुख्यमंत्र्यांना काही सांगता येत नाही. राज्याचा त्यांना अभ्यास नाही. ठाकरे कुटुंबीयांचे बरेच जमीन व्यवहार आहेत. बाळासाहेब असेपर्यंत ठाकरे कुटुंबाची शिवसैनिकांसोबत पार्टनरशिप नव्हती. मातोश्रीवर देवाण घेवाण करुन व्यवहार होतात. आमदार, खासदारांना काही स्थान नाही,” असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांत पाटील यांनी फक्त सरकार पडण्याची स्वप्न पहावीत; थोरातांचा चंद्रकांत पाटलांना टोला!
- लढा सुरूच : बिहारमध्ये सत्ता महागठबंधनचीच येणार; तेजस्वी यादवांनी व्यक्त केला विश्वास
- तिकडे ट्रम्प हरले मात्र इकडं मोदी जिंकलेच – रावसाहेब दानवे
- ‘शरद पवार यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल’
- ‘या’ जिल्ह्यातील १६ पोलीस अधिकार्यांच्या तडकाफडकी बदल्या !


