अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : आम्ही प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत. परंतु हे सरकार चार वर्ष चालणार नाही. त्याची कारणे गुलदस्त्यात आहेत. आता हे उघड करता येणार नाही. आम्ही रडत न बसता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करीत आहोत आणि सगळया प्रश्नांवर आवाज उठवित आहोत असे चंद्रकांत पाटील म्हटले होते. त्यांच्या या टीकेचा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी समाचार घेतला असून चंद्रकांत पाटील यांनी आता हे सरकार पडण्याची फक्त स्वप्न पहावीत. हे सरकार पाच वर्ष जनतेची सेवा करेल, असे ना.थोरात म्हणाले.
ना.थोरात पुढे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी हे सरकार पडण्याची फक्त स्वप्नं पहावीत. आमचं सरकार पाच वर्षे टिकणार आहे आणि यात कोणताही बदल होणार नाही. चंद्रकांत पाटील यांना काय म्हणायचे आहे ते त्यांना म्हणू द्या. तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलीही नाराजी नाही. आम्ही सर्व मिळून निवडणूक लढवत आहोत आणि आमच्या सर्वच जागा जिंकून येतील. आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. तसेच पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड आहे, असे जे सांगितले जाते, हा इतिहास झाला, आता यावेळी सर्वत्र आमचे उमेदवार जिंकतील, हे नक्की आहे, असे ना.थोरात म्हणाले.
आम्ही शपथ घेतली तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार दोन महिनेही टिकणार नाही असे भाजपाचे नेते म्हणत होते. आमच्या सरकारला वर्ष पूर्ण झाले. आताही भाजपाचे लोक हेच म्हणत आहेत की सरकार पडेल. मला खात्री आहे की उरलेली चार वर्षे हेच म्हणण्यात त्यांची जातील असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांनी टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- लवकरच महाराष्ट्रात सरकारचे फटाके वाजतील, नारायण राणेंचे मोठे विधान
- ‘शरद पवार यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल’
- ‘या’ जिल्ह्यातील १६ पोलीस अधिकार्यांच्या तडकाफडकी बदल्या !
- अयोध्येतील यंदाची दिवाळी गिनीज बुकात जाणार; साधुसंत, भक्तांमध्ये दीपोत्सवाचा उत्साह
- मेकअप खराब न करता कोरोनापासून वाचण्यासाठी सनी लिओनिची अनोखी शक्कल !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

