🕒 1 min read
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए 125 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी 110 जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंग केले. निवडणुकीत भाजपाने 74 जागांवर विजय नोंदवला, तर जेडीयूला 43 जागा मिळाल्याने आणि राजदने 75 जगांवर विजय संपादन केला, परंतु त्यांचा मित्रपक्ष काँग्रेसला अवघ्या 19 जागा मिळाल्या.
दरम्यान, सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJDला विरोधी बाकांवरच बसावं लागणार असं चित्र आता स्पष्ट झालं आहे. कारण भाजप, JDU आणि मित्रपक्षांच्या NDAला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. दुसरीकडे 70 जागा लढलेल्या काँग्रेसला अवघ्या १९ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या RJDला काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे सत्तेपासून दूर राहावं लागत आहे.
राजद बिहारमधील मोठा पक्ष बनला असून भाजप केवळ एका जागेने मागे आहे. या निवडणुकीत नितीशकुमार यांना मोठा फटका बसला आहे. मात्र, भाजप-जेडीयूला बहुमत मिळालं असलं तरी राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी हार पत्करलेली नाही.
तेजस्वी यादव यांनी आमदारांना संबोधित केलं. एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मात्र, खातेवाटपावरुन एनडीएतील घटकपक्षांमध्ये बिनसलं तर त्याचा लगेच फायदा घ्यायचा, अशी तेजस्वी यादव यांची रणनिती असल्याचे समजत आहे. त्यामुळे, तेजस्वी यादव यांनी सर्व आमदारांना पुढील एक महिना पाटण्यातच थांबण्याची विनंती केली आहे.
बिहारमध्ये सत्ता महागठबंधनचीच येणार असा विश्वास तेजस्वी यादव यांनी व्यक्त करत आमदारांना बळ दिलं आहे. तर, दुसरीकडे बिहारमध्ये काँग्रेसचे काही आमदार भाजपसोबत हातमिळवणी करण्याच्या तयारीत असल्याचा संशय तेजस्वी यांना आहे.
बिहार निवडणुकांच्या निकालानंतर प्रथमच तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “परिणाम आणि निर्णय या दोन गोष्टींमध्ये फरक असतो. निवडणुकीचे परिणाम त्यांच्या बाजूने तर निर्णय आपल्या बाजूने आहे. मी नम्रपणे हात जोडून बिहारच्या जनतेचं आभार मानतो. जनतेचा निर्णय महागठबंधनच्या बाजूने आहे. आम्हाला जवळपास 130 जागा मिळाल्या आहेत. मात्र, नितीश कुमार यांनी फसवणूक करुन सरकार बनवलं” असा आरोप तेजस्वी यादव यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शरद पवार यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल’
- लवकरच महाराष्ट्रात सरकारचे फटाके वाजतील, नारायण राणेंचे मोठे विधान
- अयोध्येतील यंदाची दिवाळी गिनीज बुकात जाणार; साधुसंत, भक्तांमध्ये दीपोत्सवाचा उत्साह
- मेकअप खराब न करता कोरोनापासून वाचण्यासाठी सनी लिओनिची अनोखी शक्कल !
- बिहारचा तिढा कायम : मुख्यमंत्री होण्यास नितीश कुमार तयार नाहीत?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

