Share

‘हे अत्यंत लज्जास्पद’; विमानतळावर सोशल डिस्टंसिंग फज्जा उडालेला जुही चावलाचा संताप…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना काळात बंद असलेली विमानसेवा नियम अटींसह पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र कोणत्याही माध्यमातून प्रवास करताना काही महत्त्वाच्या नियमांचं पालन केलं जाणं बंधनकारक असल्याचं शासनाकडूनच सांगण्यात आलं. पण, सर्वच ठिकाणी या नियमांचं पालन केलं जातंच असं नाही. मुळात ही बाब अतिशय धोक्याची आहे हेच अनेकांच्या लक्षात येत नाही आहे.

अशाच एका प्रसंगाचा सामना कराव्या लागलेल्या अभिनेत्री जुही चावला हिने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत तिनं संतापही व्यक्त केला. अभिनेत्री जुही चावलाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ती विमानतळावर उभी असल्याचं दिसत असून तिच्या मागे लोकांची खूप गर्दी जमलेली पाहायला मिळत आहे. विमानतळावर लोकांना खूप वेळ वाट पाहत थांबावं लागतंय, हे दाखवत तिने हे ट्विट केलं आहे. त्याचप्रमाणे तिने विमान प्राधिकरण व शासकीय अधिकाऱ्यांना मदतीची विनंती केली आहे.

या व्हिडिओमध्ये जुही एका विमानतळावर असल्याचं लक्षात येत आहे. तिच्या आजुबाजूला अनेक प्रवासी काहीसे चिडलेले दिसत आहेत. विमानतळ व्यवस्थापनावर त्यांचा रोष असल्याचंही या व्हिडिओतून लक्षात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रवाशांनी फेसशिल्डचा वापर तर केला आहे. पण, इथं सुरक्षित शारीरिक अंतर अर्थात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसत आहे.  ‘विमानतळ आणि शासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी एअरपोर्ट हेल्थ क्लिअरन्सजवळ त्वरित अधिकाधिक काऊंटर व कर्मचारी नियुक्त करावेत. विमानातून उतरल्यानंतर इथे प्रवाशांना तासनतास थांबावं लागतंय. ही अत्यंत दयनीय आणि लज्जास्पद अवस्था आहे,’ असं ट्विट जुहीने केलंय.

जुहीनं हा व्हिडिओ पोस्ट करत त्यासोबत लिहिलं, ‘विमानतळ आणि शासकीय अधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी इथं विमानतळावरील आरोग्य तपासणी केंद्रावर जास्तीचे कर्मचारी नियुक्त करावेत. प्रवाशांना इथं तासन् तास उभं राहावं लागत आहे. हे तर खरंच फार दयनीय आणि लज्जास्पद आहे’. विमानातळावर गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा भंग होऊ नये म्हणून विमानतळ प्रशासनाने त्वरित उपाय करावेत अशी विनंती तिने या ट्विटमधून केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!