Share

WHO : जागतिक स्तरावरील आणि सार्वभौमिक आरोग्य व्याप्तीमध्ये भारताच्या नेतृत्वाचे स्वागत!

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक आरोग्य संघटनेचे  महासंचालक टी.ए. गेब्रेयेसस यांच्यात कोरोनावर मात करण्यासाठी जागतिक स्तरावर सुरू असलेल्या भागीदारीबाबत काल चर्चा करण्यात आली. यावेळी आधुनिक वैद्यकीय पद्धतीसोबत पारंपारिक औषधांचा समावेश करण्याबाबत चर्चा झाली असल्याची समजत आहे.

यावर पंतप्रधान मोदीं ट्विट करत म्हणाले , (WHO)च्या डीजी बरोबर उत्कृष्ट संभाषण झाले, आम्ही जगात आरोग्य आणि निरोगीपणासाठी पारंपारिक औषधांच्या विशाल संभाव्यतेविषयी चर्चा केली. कोविड -१९ विरुद्ध लढ्यात मी डब्ल्यूएचओ आणि जागतिक समुदायाला भारताच्या पाठिंब्याचे आश्वासनही दिले.

 

दरम्यान,पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी संघटना आणि भारतीय आरोग्य प्राधिकरण यांच्यातील जवळच्या आणि नियमित भागीदारीवर जोर दिला आणि आयुष्मान भारत आणि क्षयरोग (टीबी) विरूद्ध मोहिमेसारख्या देशांतर्गत उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले की, जागतिक आरोग्याच्या संदर्भात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चर्चेदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांना सांगितले की, १३ नोव्हेंबर रोजी ‘कोव्हिड-१९ साठी आयुर्वेद’ या थीमवर आधारित देशात आयुर्वेद दिन साजरा केला जाणार आहे. दरम्यान, या चर्चेनंतर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी ट्विटरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विविध गोष्टी आणि प्रयत्नांसाठी आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांशी फोनवर चर्चा करत कोरोनाचा सामना करण्यासाठी जागतिक भागीदारीत समन्वय साधण्याच्या संघटनेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचे कौतुक केले. या चर्चेदरम्यान नरेंद्र मोदींनी कोरोनावर मात करताना अन्य रोगांविरूद्धच्या लढाईत सुद्धा लक्ष विचलित होऊ नये, यावरही भर दिला. विकसनशील देशांमध्ये आरोग्य यंत्रणेला संघटनेने दिलेल्या पाठिंब्याचे महत्त्वही त्यांनी व्यक्त केले.

मात्र, कोरोनाला सणवार कळत नाहीत. लस आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत स्वत:ला सुरक्षित ठेवणे गरजेचे. त्यामुळे दीपावली शुभेच्छा देताना सणाचा जरूर आनंद घ्या, पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा. शुभेच्छांसाठी केवळ सोशल मीडियाचा वापर करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!