Share

‘एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक अहंकार किंवा अजेंड्यासाठी वैयक्तिक स्वातंत्र्य ओलीस ठेवू शकत नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- अन्वय नाईक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णव गोस्वामींसह इतर दोन जणांना जामीन देण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्याबेंचसमोर गोस्वामींच्या याचिकेवर सुनावणी झाली. अर्णव गोस्वामींसाठी ज्येष्ठ वकील हरीश साळवेंनी युक्तिवाद केला. हरीश साळवे यांनी अर्णव गोस्वामींना जामीन दिल्यास आभाळ कोसळेल का?, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला.

सुप्रीम कोर्टाने प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.आत्महत्येस प्रवृत्त करणं व इतर दोन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अर्णब यांना अंतरिम जामीन देण्यास नकार देऊन त्यांना स्थानिक न्यायालयात दाद मागण्यास सांगितलं होतं. गोस्वामी यांना तळोजा येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं.

सुप्रीम कोर्टातील अपील याचिकेत केंद्र सरकार, अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रमुख, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग व अक्षता अन्वय नाईक यांना प्रतिवादी केलं होतं. राज्य सरकारच्या वतीने वकील सचिन पाटील यांनी सुप्रीम कोर्टात कॅव्हिएट दाखल केले असून गोस्वामी यांच्या याचिकेवर राज्य सरकारचं म्हणणं ऐकल्याशिवाय कुठलाही आदेश पारित करू नये अशी विनंती केली होती.

दरम्यान, अर्णव यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “धन्यवाद आदरणीय सुप्रीम कोर्ट…कायद्याचं राज्य कायम आहे. न्यायाची थट्टा करण्याची परवानही दिली जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक अहंकार किंवा अजेंडासाठी वैयक्तिक स्वातंत्र्य ओलीस ठेवू शकत नाही”. आशिष शेलार यांनी यावेळी #Arnabisback हा हॅशटॅगही दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला ही जोरदार चपराक असल्याचे सांगत जोरदार टीका केली.सोमय्या म्हणतात, ‘अर्णव गोस्वामी यांना जामीन मंजूर होणे म्हणजे अन्यायाविरोधात न्यायाचा विजय आहे. ज्या प्रकारे मुंबई पोलीस कमिशनर यांच्यापासून गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या सत्तेचा राक्षसी दुरुपयोग केला. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आज ठाकरे सरकारला चपराक लगावली आहे.’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!