🕒 1 min read
मुंबई – ठाकरे सरकारच्या आश्रयाने सोशल मिडियामध्ये जो उच्छाद मांडला जात आहे व ज्या पद्धतीने मिडियाचीही मुस्कटदाबी केली जात आहे, ती रोखण्यात यावी व सोशल मिडियाचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका भाजपाच्या शिष्टमंडळाच्यावतीने आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे मांडण्यात आल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर व मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली खासदार गोपाल शेट्टी, आमदार आशिष शेलार, आमदार भाई गिरकर, आमदार योगेश सागर, आमदार पराग अळवणी, आमदार मनिषा चौधरी, आमदार भारती लव्हेकर, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, आमदार सुनिल राणे यांच्यासह भाजपाच्या आमदारांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
सोशल मिडियाच्या माध्यमातून आपली मते व्यक्त करणा-या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येत आहे, तसेच समाजामधील जर कोणीही व्यक्ती सोशल मिडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असेल तर त्यांनाही पोलिस स्टेशनला बोलवून त्यांच्यावर गु्न्हा दाखल करणे असे प्रकार सध्या सुरु आहेत. हे प्रकार म्हणजे राज्याला अराजकतेकडे जाणारे चित्र ठाकरे सरकारच्या कारकिर्दीत निर्माण झाल्याचेही दरेकर यांनी यावेळी सांगितले.
सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त होणारे अभिव्यक्ति स्वातंत्र्य तसेच प्रसार माध्यमांची स्वातंत्र्यता याबाबत सरकारचा एकतर्फी जुलूमी कारभार सुरु आहे. त्यामुळे यासंदर्भात अंकुश आणण्यासाठी निवृत्त न्यायाधीश, मुख्य सचिव आणि सोशल मीडियामधील तज्ज्ञ सदस्यांची एक समिती नियुक्त करावी. या समितीचा अहवाल मागून राज्यपालांनी या विषयात स्वत: हस्तक्षेप करुन या गोष्टी थांबवाव्यात अशी आमची भूमिका आम्ही राज्यपाल महोदयांकडे मांडली असेही दरेकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त, योजना मात्र निरंतर सुरु
- वाढदिवशी फोटो पोस्ट केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मिलिंद सोमनच्या पुन्हा नवीन लुकची चर्चा…
- ‘या’ खास निमित्ताने सोशल मीडियावर दीपिकाने बदललं आपल नाव…
- ‘नाईक कुटुंबियांबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असती तर चांगलं वाटलं असतं’
- ‘औरंगाबादचं नाव बदलण्याने काय साध्य होणार, अस्मिता आणि प्रतिकेच्या मागे किती धावायचं’ – कोल्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
