नांदेड : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे एफआरपीचे पैसे थकले, पण यावर्षी गाळप सुरू होण्याआधी शेतकऱ्यांचे 33 कोटी रुपये आम्ही दिले. विरोधक बोंबलले पण जनता माझ्या पाठीशी राहिली, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या 25व्या गळीत हंगामाचा आज शुभारंभ झाला. मंत्री अशोक चव्हाण आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गाळप समारंभ पार पडला. या कार्यक्रमात बोलताना मंत्री चव्हाण बोलत होते.
गेल्या 24 वर्षांपासून साखर कारखान्याच्या विरोधकांना बोलायला संधी मिळाली नाही, मात्र आता त्यांना वाटलं की, संधी आली अशोक चव्हाणला ठोका…! पण जनता माझ्या पाठीशी आहे. तुम्ही कितीही बोंबलत राहा, असं अशोक चव्हाण यांनी विरोधकांना सुनावलंय. चव्हाण यांच्या कारखान्याकडे एफआरपीचे पैसे थकल्याने विरोधकांनी वेळोवेळी त्यांच्यावर टीका केली होती. आज गाळपा शुभारंभ प्रसंगी चव्हाण यांनी विरोधकांना शेलक्या भाषेत उत्तर दिलं आहे. आपल्या सुसंस्कृत शैलीत कायम बोलणारे चव्हाण आज विरोधकांवर चांगलेच घसरले, हे पाहून अनेक जण अवाक् झाले.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना हा स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी सहकारी तत्त्वावर स्थापन केलेला कारखाना आहे, ज्याच्या गाळप हंगामाला यंदा 25वे वर्ष पूर्ण झालंय. या कारखान्यामुळे अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघात आर्थिक सुबकता आलेली आहे. त्यापाठोपाठ उमरी तालुक्यातील वाघलवाडा इथे देखील त्यांचा एक सहकारी साखर कारखाना होता, जो त्यांनी आता उद्योजक मारोती कवळे गुरुजी यांना विकलाय. त्यापाठोपाठ मराठवाड्यातील सर्वात जुना असा कारखाना असलेल्या डोंगरकडा इथला साखर कारखाना भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने विकत घेतला, ज्याचे यंदा गाळप अद्याप होणे बाकी आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदी यांचे राजकीय गुरू,गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन
- राज्यपालांवर कुत्सित टीका करणे जाणत्या राजाला शोभत नाही – चंद्रकांत पाटील
- शरद पवार हेच राज्य चालवतात ; त्यामुळे उद्धव ठाकरेंना भेटून उपयोग नाही
- भारतीय संघात स्थान न मिळालेल्या सुर्यकुमार यादवला मिळाली ‘या’ देशाकडून खेळण्याची ऑफर
- विधानपरिषदेतील राज्यपालनियुक्त 12 जागांसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

