Share

मुख्यमंत्र्यांनी बंदूकबाज मंत्र्यांला जबाबदारीतून मुक्त करून हॉलीवूडला पाठवावे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बंदूक घेऊन केलेल्या स्टंटबाजी नंतर विरोधक महाजनांवर चांगलेच तोडसुख घेत आहेत. वारंवार सार्वजनिक ठिकाणी बंदूक काढून स्टंटबाजी करणारे बंदूकबाज मंत्री गिरीष महाजन यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. बंदूक चालवण्याचा अतिआत्मविश्वास कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या कुटुंबियांशी असलेल्या जवळिकीतून आला असावा असा टोला सावंत यांनी लगावला

काही दिवसांपूर्वीच त्यांनी दारूला महिलांची नावे द्यावे असे वक्तव्य केले होते. ट्रक चालवण्यासारखे स्टंट ही करून झाले आहेत.  हातात बंदूक घेऊन बिबट्याच्या मागे फिरणे हे जलसंपदा मंत्र्यांचे काम तर नाहीच पण भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याखाली गुन्हा आहे असे म्हणत बेजबाबदार पणे शस्त्राचा वापर केल्यामुळे त्यांचा शस्त्र परवाना तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. गिरीष महाजन मंत्री म्हणून कामात झिरो असल्याने अशी स्टंटबाजी करून ते हिरो होण्याचा प्रयत्न करित आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या या बंदूकबाज मंत्र्यांला मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून स्टंटबाजी करण्यासाठी भविष्यात हॉलीवूडला पाठवावे असं सावंत म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!