Share

देवेंद्र फडणवीसांच्या नंतर आता अजित पवारांनाही झाला कोरोनाचा संसर्ग

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते अनेक नेते,कलाकार,खेळाडू या विषाणूच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे. नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्याचे समोर आले होते आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

फडणवीस यांना मुंबईतील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तर पवार मुंबईतल्या कँडीमध्ये  दाखल करण्यात आले आहे. अजित पवारांना कणकण आणि ताप असल्याने आज पुन्हा कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अजित पवारांनी गेल्या आठवड्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. त्यांनी बारामती आणि परिसराची पाहणी त्यांनी केली. सोलापूर आणि पंढरपूरचा दौरासुद्धा त्यांनी केला होता.त्यानंतर एक-दोन दिवसातच ते घरी क्वारंटाईन झाले होते. त्यांनी शासकीय बैठका व पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले होते.

पवार हे एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमालाही उपस्थित नव्हते. 21 ऑक्टोबरला त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. पण ती निगेटिव्ह आली होती.सोमवारी ( 26 ऑक्टोबर) अजित पवार तपासणीसाठी ब्रीच कँडीमध्ये दाखल झाले आणि त्यांनी आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!