🕒 1 min read
रायगड : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या इराद्याने एकत्र येवून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. मात्र भिन्न विचारसरणी असणारे हे पक्ष एकत्र आल्याने अधूनमधून धुसफूस सूरच असते. कधी कॉंग्रेस-राष्ट्रवादी तर कधी शिवसेना -राष्ट्रवादी असा संघर्ष सुरूच असतो.
कोकणात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. आमदार योगेश कदम यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला आहे. आमदार योगेश कदम यांच्या दापोली विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे मला डावलून विविध शासकीय कार्यक्रम घेत असल्याचा आरोप योगेश कदम यांनी केलाय.
दरम्यान, यावर आता सुनील तटकरेंनीही प्रतिक्रिया दिली. माझ्यामुळे राज्यातल्या सरकारमध्ये समज- गैरसमज जाऊ नये म्हणून माझ्याविरोधात दाखल झालेला हक्कभंग स्वीकृत करावा, अशी विनंती मी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना करणार आहे. घटनेनुसार खासदार म्हणून मला बैठक बोलावता येते का हेही तपासावे, महाविकास आघाडीचं सरकार टिकावं म्हणून माझ्यावर कारवाई करावी, अशी भूमिका सुनील तटकरेंनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारताने ओलांडला 10 कोटी चाचण्यांचा टप्पा पार; जाणून घ्या कोरोनाबाबतची ताजी आकडेवारी
- प्रविण दरेकर आणि राधाकृष्ण विखे यांना काय चॉकलेट देवून आणलं का ? – खडसे
- खडसे साहेब शेतकरी कमकुवत झाला आहे, तिथं तुमची ताकद दाखवा – प्रवीण दरेकर
- दिवाळीपूर्वी शेतकरी आणि नुकसानग्रस्त बांधवांच्या हातात मदत पोहोचेल- उद्धव ठाकरे
- ‘एक वर्ष पक्षात असणारा व्यक्ती ४० वर्षे पक्षात राहिलेल्या व्यक्तीवर काय टीकाटिपण्णी करणार’

