अहमदनगर : भाजपमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. . खडसे हे नाराज होते. मात्र, इतकी वर्षे पक्षात राहिल्यानंतर ते आता पक्ष सोडण्याचा निर्णय घेतील असं कोणालाही वाटत नव्हतं. भाजपचे अनेक नेत्यांनी तसं बोलूनही दाखवलं होतं. त्यामुळंच खडसेंच्या पक्षांतराचा भाजपला धक्का बसला आहे. खडसेंनी केलेल्या आरोपांवर भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी त्यांच्या पक्षांतराबद्दल सावध प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुजय विखे यांना खडसेंच्या पक्षांतराबद्दल विचारलं असता त्यांनीही अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली. ‘एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते होते. मी भाजपमध्ये नव्हतो, त्या आधीपासून ते पक्षात होते. ते गेल्यामुळे पक्षाला निश्चितच नुकसान होणार आहे. पण तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. मी पक्षात नवीन आहे. मला एकच वर्ष झाले. त्यामुळे एक वर्ष पक्षात असणारा व्यक्ती ४० वर्षे पक्षात राहिलेल्या व्यक्तीवर टीकाटिपण्णी काय करणार,’ असं सुजय विखे म्हणाले.
दरम्यान, दुसरीकडे एकनाथ खडसे दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश घेणार होते त्या प्रवेशाला चार वाजले. राष्ट्रवादीचं खडसेंना काय द्यायचं ते ठरलेलं नाही. तुमचं समाधान होईल असं देऊ या शब्दावर नाथाभाऊ बळेबळे नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले. आता तुमचं समाधान होईल… यामध्ये लिमलेटच्या गोळीनेही समाधान होतं आणि कॅडबरीनेही. त्यामुळे राष्ट्रवादी आता खडसेंना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी ते बघावं लागेल,” अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर केली होती.
महत्वाच्या बातम्या
- पक्षात येवून कष्ट करण्याची भूमिका नाथाभाऊंनी व्यक्त केलीय – शरद पवार
- ‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक हातचे गेले, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा’
- भाजप निवडणूक हरली तरी लोकांना लस मोफतच मिळणार – नवाब मलिक
- शिवसेनेच्या मुंबई महापालिकेतील मनमानी कारभाराला न्यायालयाची चपराक
- नाथाभाऊ सारख्या लोकनेत्यावर भाजपने व्यक्तिगत व राजकीय असा दुहेरी अन्याय केला – धनंजय मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
