सोलापूर : राज्यात परतीच्या पावसाने धुमशान माजवल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. हाताशी आलेल्या सोन्यासारख्या पिकासह शेतातील मातीदेखील वाहून गेल्याने शेतकरी मायबाप हतबल झाले आहेत. विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असून लवकरात लवकर सरसकट मागणी करावी अशी मागणी देखील केली आहे.
विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोलापुरच्या अक्कलकोट तालुक्यातील काही नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या या दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेऊन पुढील कार्यवाहीची माहिती दिली आहे.
‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, त्याने काही मागण्यापूर्वी आम्ही मदत करु’ असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. मी कोणतीही घोषणा केली नाही, हे करु ते करु, सांगितलेलं नाही. आधी अंदाज घेऊ, माहिती घेऊ आणि जे करायचं ते करु असं त्यांनी सांगितलं आहे. तर, सद्या पंचनामे सुरु आहे, त्यानंतर प्रत्यक्ष मदत करू असा धीर त्यांनी दिला आहे.
केंद्राकडून मदत घेणार !
केंद्र सरकार हे परदेशातील सरकार नाही, ते देशाचं सरकार आहे, त्यामुळे केंद्र सरकारने कोणताही दुजाभाव न करता महाराष्ट्राला मदत करावी. गरज असताना केंद्राकडे मदत मागितली तर गैर काय? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून विचारपूस केल्याने केंद्राकडे हक्काने मदत मागणार. मोदींना जाणीव आहे, त्यांनी राज्याला सर्वोतोपरी आश्वासन दिलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- बॉलिवूडच्या काळजीत बुडालेले मुख्यमंत्री घराबाहेर पडले हे आशादायी आहे ; शेलारांचा टोला
- साखर कारखानदारांसाठी तुमच्याकडे पैसे आहेत मग शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता का ? – राजू शेट्टी
- सध्या वाईट दिवस आहेत…त्यामुळे धीर सोडायचा नाही… सरकार तुमचं आहे – शरद पवार
- मंदिरे उघडा म्हणून बोंब ठोकणाऱ्या भाजपाला भगिनींकरिता लोकल चालू होईल याची तमा नाही का?
- बेरोजगारांच्या हाताला काम देण्याऐवजी सर्जिकल स्ट्राईक, राफेलच्या चर्चा घडवल्या जातात : शिवसेना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
