Share

कर्डिले साहेब, राहुरी सोडा आणि श्रीगोंदेमधून निवडणूक लढा! नगर तालुक्यातील अनेक गावांतून मागणी!

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नगर तालुका हा पूर्वीपासून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा बालेकिल्ला समजला जातो. नगर तालुक्‍यातील अनेक गावे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात येतात.

या गावांत कर्डिले यांचे वर्चस्व आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वाटप कार्यक्रम नुकताच आगडगाव (ता. नगर) येथे झाला. यावेळी काही ग्रामस्थांनी कर्डिले यांना थेट श्रीगोंदा मतदारसंघातून लढण्याची विनंती केली. तसेच श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात असलेल्या नगर तालुक्यातील काही गावांमध्ये अद्यापही कर्डिले यांनाच लोक आमदार मानतात.

अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज वाटप कार्यक्रम नुकताच आगडगाव (ता. नगर) येथे झाला. यावेळी काही ग्रामस्थांनी कर्डिले यांना थेट श्रीगोंदा मतदारसंघातून लढण्याची गळ घातली.

श्रीगोंदे मतदारसंघातील आगडगाव व पंचक्रोशीतील काही गावे शेवटचीच आहेत. तसेच आमदार पाचपुतेही कधी इकडे फिरकत नाहीत. त्यामुळे सर्व लहान मोठ्या कामांसाठी c यांच्याच बंगल्यावर येथील ग्रामस्थ गर्दी करतात. त्यामुळेच या पंचक्रोशीतील ग्रामस्थ कर्डिले हेच आपले आमदार असल्याचे सांगतात.

मतदारसंघाची विभागणी झाल्यानंतर नगर तालुक्यातील अनेक गावे श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात गेली. कर्डिले यांचे मूळ गाव बुऱ्हाणनगर हे मात्र राहुरी विधानसभा मतदारसंघात गेले. कर्डिले यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून लढवून ते आमदार झाले.

गेल्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. परंतु नुकत्याच झालेल्या आगडगाव येथील कार्यक्रमात काही ग्रामस्थांनी कर्डिले यांना थेट याच मतदारसंघातून लढण्याची गळ घातली. आता यापुढे राहुरी मतदारसंघ सोडा, श्रीगोंद्यातून लढा. आतापर्यंत आम्ही तुमचे ऐकले. भाजपच्याच आमदाराला निवडून दिले. परंतु इथल्या प्रश्नांसाठी तुमच्याशिवाय पर्याय नाही, असे एका शेतकऱ्याने सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!