🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- नगरमधील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनधिकृत बांधकामे, गाळेवाटप, मोकळ्या जागा वाटप, बेकायदेशिररित्या केलेला दैनंदिन खर्च या माध्यमातून गेल्या सात ते आठ वर्षामध्ये विद्यमान संचालक मंडळाने सुमारे ८० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला आहे.
असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला होता. आता माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजार समिती सत्ताधार्यांनी अनधिकृतपणे बांधलेले २९ गाळे पाडण्याच्या मागणीसाठी नगर तालुका महाविकास आघाडी व नगर शहर शिवसेनेच्यावतीने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. अनधिकृत गाळे पाडण्याबाबतचे निवेदन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना देण्यात आले आहे.
बाजार समितीच्या आवारात सत्ताधाऱ्यांनी अवैधरित्या २८ गाळे बांधल्याचा आरोप नगर तालुका महाविकास आघाडी व नगर शहर शिवसेनेतर्फे करण्यात आला. हे गाळे तातडीने पाडावेत अशी मागणी करत नगर तालुका महाविकास आघाडीचे बाळासाहेब हराळ व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
आठ दिवसांत त्वरित कार्यवाही न झाल्यास नगर तालुका महाविकास आघाडीच्यावतीने जिल्हाप्रमुख प्रा.गाडे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख दिलीप सातपुते, बाळासाहेब हराळ, संभाजी कदम, अनिल शिंदे, संजय शेंडगे, नगरसेवक योगीराज गाडे, दत्ता कावरे, मदन आढाव, नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत, प्रशांत गायकवाड, शाम नळकांडे, संग्राम कोतकर, उपसभापती रविंद्र भापकर, केशवराव बेरड यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या :-
- लोकशाहीचा चौथास्तंभ कमजोर करण्याचे कारस्थान टीआरपी घोटाळ्यातून उघड
- #TRPSCAM : ‘आघाडी सरकारच्या अपयशावरून अन्यत्र लक्ष वळविण्यासाठी वाहिन्यांवर कारवाई’
- मंदिरे उघडण्यासाठी भाविकांच्या उपोषणाला भाजपाचा पाठिंबा
- मालवाहतुक अभियान : रेल्वेच्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या उत्पन्नात होतेय भरघोस वाढ
- ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
