🕒 1 min read
लखनौ- हाथरस प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने मोठी कारवाई करत एसपी, डीएसपी आणि इन्स्पेक्टर यांना निलंबित केले आहे. तसेच पीडितेच्या कुटुंबियांसह पोलिसांचीही नार्को पॉलिग्राफी टेस्ट करण्यात येणार आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
एसआयटीच्या प्राथमिक अहवालानंतर योगी सरकारने ही मोठी कारवाई केली आहे. हाथरसचे एसपी, डीएसपी आणि पोलीस इन्सपेक्टर यांच्यावर योगी सरकारने कारवाई केली आहे. या बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत होती. स्थानिक प्रशासनाविरोधात नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात होता. अखेर योगी सरकारने ही मोठी कारवाई केलीये.
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या SIT च्या प्राथमिक अहवालानुसार हाथरसचे जिल्हा पोलीस प्रमुख विक्रांत वीर , पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईत झाली असून त्यांच्यासह हाथरस पोलीस ठाण्यातील सर्व पोलिसांची आता नार्को पॉलिग्राफ टेस्ट देखील केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, पीडित मुलीच्या कुटुंबियांचीही नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे.
दरम्यान,यूपी सरकारच्या या कारवाई वर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी जोरदार टीका केली आहे.पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करुन जबाबदारी झटकू नये, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी प्रियांका गांधींनी केली. ‘योगी आदित्यनाथ जी काही मोहऱ्यांना निलंबित करुन काय होणार आहे? हाथरसची पीडिता, तिच्या कुटुंबाला भयानक परिस्थितीला कुणाच्या आदेशावरून सामोरे जावे लागले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, हाथरसचे जिल्हाधिकारी एसपी यांचे फोन कॉलवरील संभाषण सार्वजनिक करा.मुख्यमंत्रीजी तुम्ही तुमच्या जबाबदारीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करु नये. देश आपल्याला बघत आहे, तुम्ही राजीनामा द्या.’, अशी मागणी प्रियांका गांधी यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- शेतक-यांना भूमिहीन करून उद्योगपतींचा फायदा करण्याचा भाजप सरकारचा डाव
- प्रचंड दबावानंतर हाथरस प्रकरणी योगी सरकारची मोठी कारवाई
- #हाथरस प्रकरणी अखेर योगी आदित्यनाथ यांनी सोडले मौन, म्हणाले…
- मार्कंडेय काटजूंचे वादग्रस्त वक्तव्य; हाथरस प्रकरणाचं फोडलं बेरोजगारीवर खापर
- उत्तर प्रदेशातील गुंडा राजमध्ये महिला सुरक्षित नाहीत- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
