🕒 1 min read
मुंबई : हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी-प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच वेळी पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखलं. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात होती. याच दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
या सगळ्या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे. निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विसरू नये, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे. हाथरसची घटना मन विषण्ण करणारी आहे, असं भुजबळ म्हणाले.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेली वागणूक निषेधार्ह असल्याचं देखील भुजबळ म्हणाले. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर देशात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न पडला आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महात्मा गांधी यांची जयंती आणि गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींना धक्काबुक्की तसंच त्यांच्यावर लाठीचार्ज होणं हे निंदनीय आहे. देशाच्या संसदेतील एका वरिष्ठ नेत्याला अशा प्रकारची वागणूक दिली जात आहे, तिथे सर्वसामान्य नागरिकांची काय हालत असेल, असं भुजबळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींवर बळाचा वापर करणाऱ्या युपी पोलिसांना निलंबित करा – विद्या चव्हाण
- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन तूर्तास स्थगित, मात्र….
- न्याय कृष्णकुंजवरच मिळतो; राज ठाकरेंच्या भेटीनंतर डबेवाल्यांची राज्य सरकारनेही घेतली दखल
- अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी ठाकरे सरकार राबविणार ‘ही’ योजना
- कंगना नंतर आता रवी किशन यांना सुद्धा वाय प्लस सुरक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
