🕒 1 min read
मुंबई- हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी-प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी दोघेही यमुना एक्सप्रेसवरून पायी चालत निघाले असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच वेळी पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखलं. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात होती. याच दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.
https://twitter.com/HardikPatel_/status/1311605937623363585?s=20
काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती वाटत आहे अशी विचारणा काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. तर राहुल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचे गुजरातमधील नेते हार्दिक पटेल यांनाही ट्विटवरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना, ‘उत्तर प्रदेश किसी के पापा का नहीं हैं’ म्हणत योगी सरकारला झापले आहे.
हाथरसमधील पीडितेच्या दुःखात बुडालेल्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पायी चालत निघालेले काँग्रेसचे नेते मा.@RahulGandhi जी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा आणि अटकेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. देशात लोकशाही शिल्लक आहे की नाही?#JusticeForIndiasDaughters pic.twitter.com/gjpCHKkNOF
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) October 1, 2020
दरम्यान, हाथरसमधील पीडितेच्या दुःखात बुडालेल्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी पायी चालत निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीचा आणि अटकेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. देशात लोकशाही शिल्लक आहे की नाही? असा सवाल कॉंग्रेस नेते धीरज देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
हाथरस पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जाणाऱ्या मा. राहुल गांधी व मा. प्रियांका गांधी यांना अडवून धक्काबुक्की करत अटक करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांच्या दडपशाही विरोधात प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे मंत्रालयाजवळ आंदोलन करण्यात आले. #डरपोक_योगी pic.twitter.com/uectUqN0g1
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 1, 2020
तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की झाली हे अतिशय निंदाजनक आहे. या घटनेचा मी जाहीर निषेध करते, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. कुठल्याही राज्याचं प्रशासन असू दे बलात्कारासारखी लाजिरवाणी घटना घडल्यावर प्रशासनाने फास्टट्रॅक पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे. ती व्हावी या मागणीसाठी संसद सदस्य असलेले राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात होते. त्या ठिकाणी युपी सरकारकडून दडपशाही होणार असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करते. पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे, याचा न्याय मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे मागते आहे, असे वक्तव्य सुळे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या : –
- पोलिसांनी लोकप्रतिनिधी वा कुठल्याही व्यक्तीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे?
- एमपीएससी परीक्षा पुढे ढकला, अन्यथा परीक्षा केंद्रचं फोडू; मराठा समितीचा आक्रमक इशारा
- हाथरस प्रकरणाच्या निषेधार्थ रिपाइंचे मुंबईत आंदोलन,आठवले घेणार युपीच्या राज्यपालांची भेट
- उत्तर प्रदेशात जंगलराज; पोलीस फक्त तमाशा पाहत बसले आहेत : हार्दिक पटेल
- मराठा आरक्षणासाठी सरकारने आमच्यावर मोर्चे काढण्याची वेळ येऊ देऊ नये – विनोद पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
