🕒 1 min read
पाटणा – उत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर गावातील सवर्ण तरुणांनी अत्याचार करून तिच्या पाठीचा कणा तोडला व जीभ कापली त्यानंतर तिला शेतात मेली आहे असे समजून टाकून दिले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर काल या तरुणाने या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.
उत्तर प्रदेशमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत असून यावरून अस स्पष्ट होते की, उत्तर प्रदेश सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, अशा योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो. असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
महिलांसोबत कोणी काहीही करू शकतो अशी मानसिकता झाली आहे. लोकांनी आता या प्रकरणावर बोलले पाहिजे. या प्रकरणात सरकारने एसआयटीची नेमणूक करायची काहीही गरज नाही. यातील आरोपींची नावे पीडित तरुणीने घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी लोकांची दिशाभूल करण्याची गरज नसून मुलीच्या जबानीवरुन आरोपींना अटक केली आहे. त्यांना कठोर शासन करा. अशी मागणी ही त्यांनी केलीय.
महत्वाच्या बातम्या : –
- महावितरणमध्ये नियुक्त्या न झाल्यास माजी ऊर्जामंत्र्यांचा आंदोलनाचा इशारा
- महाविकास आघाडीच्या खुर्चीखाली बॉम्ब, भाजप-सेनेची पुन्हा युती…
- अंगणवाडी ताई म्हणजे कोविड योद्धाच, त्यांचा योग्य सन्मान करणार – ॲड. यशोमती ठाकूर
- मानवतेची सेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय – राज्यपाल
- अंगणवाडी ताई म्हणजे कोविड योद्धाच, त्यांचा योग्य सन्मान करणार – ॲड. यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
