Share

मराठा आरक्षण: सरकारने गांभीर्य दाखवले नाही तर रस्त्यावर उतरू ; शिवेंद्रराजेंचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

सातारा : मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा चिघळताना दिसत आहे. सरकारी नोकऱ्या तसेच शैक्षणिक प्रवेशात मराठा आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०१८ साली बनविलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीस सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. ज्यांना यापूर्वी या आरक्षणाचा लाभ मिळाला आहे, त्याला धक्का लागणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या या अंतरिम आदेशामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला असून याचे खापर आता महाविकास आघाडी सरकारवर फोडले जात आहे.

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील मराठा आरक्षण प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवेंद्रराजेंनी ” आपण पूर्णपणे मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन केले. यासोबतच शासनाने गांभीर्याने मराठा आरक्षणावर भूमिका घेतली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू” असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेसच्या काही नेत्यांना हे आरक्षण नको होतं. त्यांना मराठा आरक्षण म्हणजे कमीपणा वाटत होता, असा घणाघात पाटलांनी केला आहे. यासोबतच मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही काँग्रेस नेत्यांची अनेक वर्षांची मानसिकता आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत गांभीर्यपूर्वक प्रयत्न केले गेले नाहीत असा आरोप देखील यावेळी त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:-

माझी तब्येत ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या- प्राजक्त तनपुरे

कंगनाच्या ड्रग्स प्रकरणी प्रश्न विचारले असता गृहमंत्र्यांनी उत्तर देणे टाळले

गिरड मनसेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले अनोखे गिफ्ट बघाच

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!