Share

माझी तब्येत ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या- प्राजक्त तनपुरे

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महाराष्ट्र विधान मंडळाचे अधिवेशन सोमवार दि.७ पासून सुरू झाले होते. विधानसभा अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक आमदाराला कोरोनाची चाचणी बंधनकारक केली होती. त्यानुसार मी आपली कोरोना चाचणी करून घेतली. त्यामध्ये मला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने मी मुंबईलाच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत असून आता माझी तब्येत ठीक आहे. सर्व नागरिकांनी स्वतःची व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाचे आमदार व राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मतदार संघातील सर्व जनतेला केले आहे.

जनतेला आवाहन करताना ना.तनपुरे म्हणाले की, माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मी तात्काळ औषधोपचार सुरू केले आहेत. सध्या माझी प्रकृती स्थिर असून मला कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे कोणीही काळजी करू नये. मतदारसंघातील सर्वांच्या शुभेच्छा, पाठबळ, थोरामोठ्यांचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत. त्यामुळेच या संकटातून मी निश्चितच बरा होईल व पुन्हा तुमच्या सेवेत रुजू होईल याची मला खात्री आहे. असे तनपुरे म्हणाले.

आपल्या सर्वांचा स्नेह, प्रेम हीच माझी ऊर्जा आहे. आपण सर्वजण फोन, मेसेज, निरोप देऊन माझी विचारपूस व काळजी घेत आहात त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. सर्वांना माझी कळकळीची नम्र विनंती आहे की, कोरोना आजाराला एवढे सहज घेऊ नका. स्वतःची काळजी घ्या. संसर्ग साखळी तोडण्यासाठीचे नियम पाळा, व्यक्तिगत स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे आरोग्य सांभाळा असे आवाहन ना.तनपुरे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या:-

कंगनाच्या ड्रग्स प्रकरणी प्रश्न विचारले असता गृहमंत्र्यांनी उत्तर देणे टाळले

तहसील कार्यालयातील रिकामी जागा का हवी आहे ‘या’ माजी आमदारांना

गिरड मनसेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले अनोखे गिफ्ट बघाच

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!