Share

तहसील कार्यालयातील रिकामी जागा का हवी आहे ‘या’ माजी आमदारांना

Published On: 

🕒 1 min read

वाशीम : जिल्हा उद्योग केंद्र, महा. राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही कार्यालये भाड्याच्या इमारतीत असल्यामुळे शासनाला महिन्याकाठी लाखो रुपयाचा भुर्दड सोसाावा लागत आहे. त्यामुळे उपरोक्त तिनही कार्यालयाकरीता जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपाचे माजी आमदार विजयराव जाधव यांनी जिल्हाधिकारी यांचेमार्फत पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

वाशीम जिल्हा हा औद्योगीक दृष्टीने अतिशय मागासलेला असून, या जिल्ह्याच्या मुख्यालयी असणार्‍या जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ही कार्यालये उद्योग वाढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत. सद्यस्थितीत वाशीम जिल्ह्यात उद्योग भवन नसल्यामुळे उपरोक्त तिनही कार्यालये वेगवेगळ्या भाड्याच्या इमारतीत आहेत. त्यामुळे शासनास भाड्याचा भुर्दड मोठ्या प्रमाणात करावा लागतो, तसेच उद्योजक अथवा नविन उद्योग सुरु करणार्‍यांना सबंधित कार्यालयात कामाकरीता 3 ठिकाणी जाण्याचे प्रसंग येतात व त्यामुळे वेळ व पैसा खर्च होवून कामाला विलंब होतो.

वाशीम जिल्हा मुख्यालयी तहसील कार्यालयाच्या आवारात कोषागार कार्यालयाची रिकामी असलेली जागा उपरोक्त कार्यालयाकरीता उपलब्ध करुन दिल्यास उद्योजकांना होणारा त्रास व शासनाच्या खर्चाच अपव्यय टाळता येवू शकतो. त्यामुळे उद्योग भवनाकरीता जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी भाजपाचे माजी आमदार विजयराव जाधव यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांचेमार्फत पालकमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

महत्वाच्या बातम्या:-

गिरड मनसेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले अनोखे गिफ्ट बघाच

सरकारने अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही-शरद पवार

ताडोबातील ‘त्या’ गावातील सुटणार का समस्या ? काय ठरले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या बैठकीत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!