Share

ताडोबातील ‘त्या’ गावातील सुटणार का समस्या ? काय ठरले पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या बैठकीत

Published On: 

🕒 1 min read

चंद्रपूर : जिल्ह्यातील अतिप्रदुषित क्षेत्रातले प्रदुषण नियंत्रण करण्याबाबत गुरूवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होती. आभासी बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकारी सहभागी झाले होते.जिल्ह्यात प्रामुख्याने प्रदुषण निर्माण होणार्‍या कोळसा खाणी, औष्णिक वीज केंद्रे, धुळ आदींमधून निर्माण होणार्‍या प्रदुषणाला आळा घालण्याच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली. राज्यातील औष्णिक वीज केंद्रातील प्रदुषण नियंत्रणाबाबत उर्जामंत्री आणि उर्जा विभागाबरोबर नुकतीच बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वसमावेशक पर्यावरण प्रदूषण निर्देशांक कमी करण्यासाठी उपाययोजना करणे व प्रदुषण नियंत्रण आराखडा तयार करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

ठाकरे म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आणि औष्णिक वीज निर्मिती केंद्रे आहेत. संवेदनशील वन क्षेत्रात येणार्‍या कोळसा खाणींचे लिलाव न करता तेथील वनसंपदा आणि पर्यावरण जपावे, यासाठी पर्यावरण विभागामार्फत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यातील काही कोळसा खाणींचे लिलाव रद्द करण्यात आम्हाला यश आले आहे. याचबरोबर राज्यातील सर्व औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून होणार्‍या प्रदुषणाला नियंत्रित करण्याबाबतही नुकतीच आम्ही उर्जा विभागाबरोबर बैठक घेऊन याचे सविस्तर नियोजन केले आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील वीज केंद्रांचाही समावेश आहे.

याच धर्तीवर एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याबरोबर समन्वय करुन उद्योगांमधून होणारे प्रदुषण, सांडपाणी व्यवस्थापन तसेच रस्ते आणि इतर बाबीतून निर्माण होणार्‍या धुळीसारख्या प्रदुषण नियंत्रणासाठीही कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यात प्रदुषण निर्माण करणार्‍या बाबी, हरित लवादाचे विविध निर्णय आदींबाबत पर्यावरण विभागाने स्थानिक कार्यालयाकडून माहिती घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदुषण नियंत्रणाबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

वडेट्टीवार यांनी, महानगरांमध्ये असलेल्या कोल डेपोंचे बाहेर स्थलांतर करण्यात यावे. राष्ट्रीय हरित लवादाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे पालन व्हावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी ताडोबा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामधील गावांच्या अडीअडचणी व त्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगानेही बैठक घेण्यात आली. या भागातील प्रतिबंधित कृती वगळता इतर क्षेत्रात विकास कामे करणे, रोजगार निर्मितीसाठी इको पर्यटनाला चालना देणे या अनुषंगाने यावेळी चर्चा करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या:-

आयसीसी दक्षिण आफ्रिका संघावर बंदी घालणार ?

वाढीव वीज बिलांसंदर्भात भाजप आक्रमक, वीज बिलांची केली होळी

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही काँग्रेसची मानसिकता ; चंद्रकांत पाटलांची जहरी टीका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!