🕒 1 min read
अमरावती : लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण कंपनीने नागरिकांना अवाजवी भरमसाठ वीज बिले पाठवली. ही बिले कमी करण्यासाठी महावितरण कंपनीला अनेक निवेदने देऊन, चर्चा करुन त्यांना या संबधी जनतेच्या तीव्र भावना व अडचणीच्या परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली होती. परंतु याची कुठलीही दखल न घेता कंपनीने भरमसाठ बिले पाठवणे सुरुच ठेवले आहे.
भाजपाने राज्यात सर्वत्र आंदोलने केली, परंतु वारंवार आंदोलने करुनही सरकार दखल घेत नसल्याने वीजबील माफीसाठी राज्यभरातून हजारो पत्र व ई मेल मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले. नागरिकांच्या समस्या सोडवण्यात हे महाआघाडी सरकार सपशेल नापास झाले आहे. मुख्यमंत्री जनतेमध्ये न जाता जनतेचे प्रश्न न समजावून घेता निव्वळ घरात बसून व्हीडीओ कॉन्फरंसिंगने अधिकार्यांशी संवाद साधत राज्य चालवत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे, तर नागरिक अशी भरमसाठ वाढलेली वीज बिले कोठून भरणार, असा सवाल करत सरसकट वीज बीले माफ करुन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने बुधवारी निवेदन देऊन केली. तसेच अमरावती येथील महावितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाबाहेर भाजपा अमरावती शहर जिल्हा शाखेने अकार्यक्षम ठाकरे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत महा वितरणने पाठवलेल्या अन्यायकारक वीज बिलांची होळी करून सरकारचा तीव्र निषेध केला.
या प्रसंगी महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसुम साहु, मनपा स्थायी समिती सभापती राधा कुरील प्रा. रवि खांडेकर, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, गजानन देशमुख, मंगेश खोंडे, दीपक खताडे, मनपा पक्षनेता सुनील काळे, उपाध्यक्ष विनय नगरकर, धीरज बारबुध्दे, संजय तिरथकर, डॉ. प्रणय कुळकर्णी, पद्मजा कौडण्य, लता देशमुख, प्रणित सोनी, श्याम पाध्ये यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:-
मराठा समाजाला आरक्षण मिळू नये ही काँग्रेसची मानसिकता ; चंद्रकांत पाटलांची जहरी टीका
नीटच्या परीक्षेसाठी विदर्भात धावणार लालपरी, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
