Share

मी घरची धुनी रस्त्यावर धूत नाही , फडणवीसांचा खडसेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठवाडा, कोकणातून प्रत्येकी तीन मुख्यमंत्री झाले. मात्र उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री होऊ दिला नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आला, त्याला बाजूला सारले गेले अशी खंत, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. त्याचवेळी मला उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्यामुळे त्रास झाला. मला जो त्रास झाला तो फक्त फडणवीस यांच्यामुळे म्हणून त्यांचे नाव घेतो, असे जाहीर वक्तव्य खडसे यांनी केले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे.

जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथ खडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमावेळी खडसेंनी आपले मनोगत मांडले. त्यावेळी फडणवीस यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.

एकनाथ खडसे यांच्या या आरोपांना उत्तर देण्याचे फडणवीस यांनी टाळले असून ‘मी घरची धुनी रस्त्यावर धूत नाही’, असा टोला देखील फडणवीसांचा खडसेंना लगावला आहे. हॅकर मनीष भंगाळे प्रकरणात एकनाथ खडसे यांनी क्लीन चिट देण्यात आली होती. तर भंगाळेला १२ तासात उचलून जेल मध्ये टाकले होते. असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे. तर ते आमचे जेष्ठ नेते मी त्यांच्यावर आरोप करणार नाही त्यांच्या काही तक्रारी असतील त्या घरात बसून दूर करू अस देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

चीनने भारताची जमीन घेतली हे देखील देवाची करणी आहे का ?- राहुल गांधी

रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ उतरली काँग्रेस

ऊसतोड कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात साखर संघाचे अध्यक्ष व ऊसतोड कामगार व वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक पार पडली

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!