🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वी कंगना रणौतच्या आईने उद्धव ठाकरेंसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व सोनिया गांधींवर जहरी टीका केली होती. यानंतर त्यांना रोषाला देखील सामोरं जावं लागलं होत. तर, या ट्विटमुळे अनेक वर्षे काँग्रेसशी निगडित असलेल्या कंगनाच्या आईने भाजपची वाट धरल्याने बोलले जाऊ लागले होते.
आशा रणौत यांनी मुंबईत कंगणाचं कार्यालय बीएमसीने पाडल्यानंतर ” BMC कर लो बेटा …. लेकिन इतना याद रखना , अगले चुनाव के बाद उद्धव की शवसेना , सोनिया सेना , और टेढे मुहं वाले पवार की सेना .. इन सभी को महाराष्ट्र की जनता स्थायी रूप से क्वारेंटाइन करने वाली है …”अशी वादग्रस्त टीका केली होती.
यानंतर आता, आशा रणौत यांच्या भूमिकेवरून त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजप प्रवेश केला असल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. त्यांनी ” कंगनाची आई आशा रानावत ने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उगाच झांशी की रानी ही उपमा दिली जात नाही. महाराष्ट्राच्या बदनामीचे कारस्थान भाजपाचे आहे हे स्पष्ट झाले आहे. मुंबई ला पाकिस्तान म्हणवून भाजपाने महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, १०६ हुतात्म्यांचा घोर अपमान केला आहे.” असे ट्विट करत भाजपला लक्ष्य केले आहे.
.@KanganaTeam ची आई आशा रानावत ने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. उगाच झांशी की रानी ही उपमा दिली जात नाही. महाराष्ट्राच्या बदनामीचे कारस्थान भाजपाचे आहे हे स्पष्ट झाले आहे. मुंबई ला पाकिस्तान म्हणवून भाजपाने महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचा, १०६ हुतात्म्यांचा घोर अपमान केला आहे.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 11, 2020
महत्वाच्या बातम्या:-
चीनने भारताची जमीन घेतली हे देखील देवाची करणी आहे का ?- राहुल गांधी
रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ उतरली काँग्रेस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
