Share

भाजपकडून पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत!

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- पुण्यातील टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील कोविड केअर रूग्णालयात कोरोनावर उपचार सुरू असताना निधन झाले. पांडुरंग रायकर हे मूळचे हंगेवाडी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगरचे सुपुत्र होते. त्यांच्या निधनानंतर आज भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी रायकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच भाजपच्या वतीने ५ लाख रुपये मदतीचा हात रायकर कुटुंबीयांना दिला आहे.

प्रा.राम शिंदे म्हणाले, मी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून ५ लाख रुपये रायकर कुटुंबियांना मिळवून दिले. तसेच मी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत फोनवर चर्चा केली असून, स्व.पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचे विमा कवच व सरकारी नोकरीत पत्नीचा समावेश व्हावा अशी मागणी केली आहे. येत्या अधिवेशनात वरील मागण्या मंजूर करून रायकर कुटूंबाला न्याय देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असल्याचे प्रा.शिंदे यांनी सांगितले.

अहो कसला फोन,उलट दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अहमदनगर जिल्ह्यातील एका उमद्या पत्रकाराचा जीव गेला आहे. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी प्रा.राम शिंदे यांनी केली आहे. यावेळी श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते, श्रीगोंदा भाजपचे माजी अध्यक्ष बाळासाहेब महाडिक यांच्यासह तालुक्यातील भाजप नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

कपूर घराण्यात कोरोनाचा शिरकाव!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!