🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेचे श्रद्धास्थान असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. दुबईवरुन मातोश्रीवर चार फोन आल्याची बातमी समोर आली आहे. यानंतर मातोश्रीची सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
यानंतर आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी या घटनेची माहिती घेतली असून पुढील सुचना देण्यात आल्या आहेत.पण यावर आता प्रतिक्रिया येणं सुरू झाले आहे. भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.
मातोश्री उडवून देण्याची धमकी मोठी बातमी : मातोश्रीवर दुबईवरून आला धमकीचा फोन…
आता नवीन नाटक.. अपयश आणि अपराध लपवण्याचा अजून एक प्रकार. आज मातोश्री मध्ये राहणाऱ्या एका ही व्यक्ती वर एकही केस नाही आणि ना ह्यांची दाऊदच्या विरोधात मोहीम, मग धमकी का येईल? मग सांगणार आंगवर आले आम्ही उडवून दिले पण खरं कोणही आलेलाच नसतो. उलट दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे असं त्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
आता नवीन नाटक.. अपयश आणि अपराध लपवण्याचा अजून एक प्रकार. आज मातोश्री मध्ये राहणाऱ्या एका ही व्यक्ती वर एकही केस नाही आणि ना ह्यांची दाऊदच्या विरोधात मोहीम, मग धमकी का येईल? मग सांगणार आंगवर आले आम्ही उडवून दिले पण खरं कोणही आलेलाच नसतो. उलट दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे. https://t.co/DpuOMe16GG
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 6, 2020
दरम्यान याआधीही महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांना धमक्या देण्यात आलेल्या आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा अशाप्रकारे धमक्या देण्यात आल्या होत्या. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने हे शहर अतिशय संवेदनशील मानले जाते.कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम देशाबाहेर राहुन मुंबईतील त्याचे अवैध धंदे चालवत असतो. पण आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरेंच्या काळात अशी धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.
पबजी बॅनवर ‘अमुल’ च खास डूडल होतंय प्रचंड व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
