मुंबई : कोरोनाने भारतासह जगभरात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस देशातील कोरोना रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. तर, गेल्या ५ महिन्यात राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूड स्टार्सपर्यंत अनेकांना कोरोनाचा विळखा बसल्याचे समोर येत असून आता बॉलिवूड क्षेत्रातील प्रतिष्ठित कुटुंब असलेल्या कपूर घराण्यात देखील आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजत असून याबाबत त्याने इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली हे तुम्हाला सांगणं माझी जबाबदारी आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं नाही आणि मी ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी पूर्णपणे बरा होईपर्यंत घरातच आयसोलेशनमध्ये आहे. माझ्या आरोग्याबाबत ही महिती देत राहेन.”
मातोश्री उडवून देण्याची धमकी मोठी बातमी : मातोश्रीवर दुबईवरून आला धमकीचा फोन…
दरम्यान, मे महिन्यामध्ये बोनी कपूर यांच्या घरातील स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आला होता. आज दिवसभरात अनेक लोकप्राधिनिधींना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. याआधी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना देखील कोरोना झाला होता.
पबजी बॅनवर ‘अमुल’ च खास डूडल होतंय प्रचंड व्हायरल


