🕒 1 min read
औरंगाबाद: भाजपचं घंटानाद आणि प्रकाश आंबेडकरांच्या थेट पंढरपूरतील आंदोलनाने राज्यात धार्मिक स्थळ उघडण्यासाठीची मोहीम जोरदार सुरू असतानाच आता यात एमआयएमचे खासदार ईम्तीयाज जलील यांनी उडी घेतली आहे.त्यांनी ट्विटरवरून “आज मंदिर कल मस्जिद” अशा आशयाचं ट्विट केलय.
राज्यातील मंदिरं उघडली गेली तर आमच्या मशिदींमध्ये नमाज अदा करु असा पवित्रा जलीलांनी घेतलेला आहे.यापुर्वीही जलीलांनी सरकारने मस्जिद उघडण्यासाठी परवानगी दिली नाही तर आम्ही 2 सप्टेंबरला स्वतः मशिदी उघडू अस वक्तव्य केलं होतं. एमआयएम आणि वंचित सध्या धार्मिक स्थळांबाबत फार आक्रमक झाल्याचं दिसतंय.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका दिग्गज आमदाराला कोरोनाची लागण
Aaj mandir…. kal masjid !!
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) August 31, 2020
वंचित बहुजन आघाडीचे मुख्य नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील मंदीरं उघडण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यानंतर त्यांनी काल पंढरपूरात असंख्य समर्थकांसह आंदोलन करुन विठ्ठलाचं दर्शन घेतलं होतं .या आंदोलनावेळी सोशल डिस्टनसिंगचा मात्र पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला.
शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज खासदाराला कोरोनाची लागण
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊन प्रतिबंधात्मक आदेश असताना प्रकाश आंबेडकर यांनी 1100 ते 1200 लोकांचा जमाव जमवला. यावेळी मास्क घातला नाही तसंच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. संचारबंदी व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमामधील तरतुदीचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलनासाठी एकत्र जमा होऊन घोषणाबाजी केली.
बाप्पा चालले गावाला…चैन पडेना आम्हाला!
दरम्यान, यापूर्वी भाजपनेही मंदिरं उडण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी ‘दार उघड उद्धवा दार उघड’ या घोषणेने आंदोलने केली होती.या आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. भाजप,वंचित आणि एमआयएमच्या धार्मिक स्थळांबाबत अशा भूमिकांवर आता सरकार काय निर्णय घेते यावर सगळ्यांच लक्ष लागून आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

