Share

शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज खासदाराला कोरोनाची लागण

Published On: 

🕒 1 min read

नाशिक : दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा वाढत आकडा हा नवनवीन उच्चांक गाठत असतानाच सामान्य व्यक्तीपासून ते राजकीय नेते, मंत्री, लोकप्राधिनिधी व बॉलिवूड स्टार्सना देखील कोरोनाचा विळखा पडत असल्याचे दिसून येत आहे. आता, नाशिकचे शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

खासदार हेमंत गोडसे यांनी याबाबत स्वतः ट्विट करून माहिती दिली असून संपर्कात आलेल्या व्यक्तींना गरज असल्यास स्वतःची कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन देखील केले आहे. “माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला.मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी व सहकाऱ्यांनी  काळजी म्हणून वैद्यकिय सल्ल्याने गरज असल्यास स्वतःची कोरोना चाचणी करावी.मी यथाशक्य माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरू ठेवेन,व कोरोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन.” असे ट्विट खासदार गोडसेंनी  केले आहे.

बाप्पा चालले गावाला…चैन पडेना आम्हाला!

दरम्यान, कालच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. सुबोध भावे यांनी ट्विट करून ही माहिती दिली असून त्यांची पत्नी मंजिरी व मोठा मुलगा कान्हा याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन!

तर, राज्यात काल 11852 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व  नवीन 11158 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 573559 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले असून राज्यात एकूण 194056 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.37% झाले असल्याचे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यात धार्मिकस्थळं लवकरच सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले : प्रकाश आंबेडकर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!