🕒 1 min read
सातारा : सातारा जिल्ह्यातील वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार मकरंद पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना आता साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची तब्येत आता स्थिर आहे. यापूर्वी साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. मकरंद पाटील हे माजी खासदार स्व.लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव आहेत.
मार्च महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार पाटील प्रशासनाला सोबत घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी सतत मतदारसंघात संपर्क दौऱ्यावर होते. मार्च महिन्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. त्यातच सातारा जिल्ह्यात पहीला कोरोना बाधित रुग्ण खंडाळा येथे आढळून आला होता. त्यानंतर मतदार संघात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून आ.पाटील प्रशासनाला सोबत घेऊन लोकांना सतर्क करत होते.
शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज खासदाराला कोरोनाची लागण
आमदार मकरंद पाटील कोरोना बाधीत झाल्याचे समजताच मतदार संघासह जिल्ह्यातील त्यांचे कार्यकर्ते, समर्थक व मित्र मंडळींना एकच धक्का बसला आहे. अलीकडच्या काही दिवसांत जर कोणी माझ्या संपर्कात आले असेल तर त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
बाप्पा चालले गावाला…चैन पडेना आम्हाला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

