🕒 1 min read
मुंबई : भाजपाला धक्का देत महायुतीमधून शिवसेना बाहेर पडली आणि सत्तेच्या गणिताचा मेळ बसवत शिवसेनेने, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. यानंतर मात्र, या आघाडीतील पक्षांमध्ये पहिल्या सहामाहीमध्येच अंतर्गत नाराजीचे सूर बाहेर येऊ लागले होते. विरोधी बाकावर बसलेल्या भाजपाने तर या सरकारवर निशाणा साधण्याची कोणतीही संधी न सोडता ‘हे सरकार फार काळ टिकणार नाही’, असा अंदाज लावला होता.
यानंतर, निधी वाटपातील दुजाभाव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, महाजॉब्स पोर्टल प्रकरण अशा अनेक प्रकरणांवरून काँग्रेसची उघड नाराजी समोर येत असतानाच आता आणखी एका मुद्याची यात भर पडली असल्याने महाविकास आघाडीतील दुरावा वाढत जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
प्रकाश आंबेडकर आंदोलन करण्यावर ठाम, आमच्या आंदोलनानंतर सर्व मंदिर खुली होणार असा दावा
ठाकरे सरकारची वचनपूर्ती असा संदेश देणाऱ्या बॅनरच्या शेजारीच काँग्रेसने, “सरकार तिघांचं, मग नाव का फक्त दोघांचं”, असा प्रश्न बॅनरच लावून विचारला आहे. “सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर जनकल्याण करणारे ठाकरे सरकार, महाराष्ट्रात सत्तेवर आले असते का?”असा थेट प्रश्न विचारून आपली नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी हा बॅनर लावलेला असून एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या दोघांवर खरमरीत टीका देखील त्यांनी केली आहे.
@OfficeofUT सरकारमध्ये @INCIndia ला कोणी विचारत नाही हे रोज समोर येत आहे. आता तर थेट काॅग्रेस पोस्टरबाजी करू लागली आहे.गांधीनी पाठिंबा दिला नसता तर ठाकरे सरकार, महाराष्ट्रात सत्तेवर आले असते का?सरकार तिघांचं नाव का फक्त दोघांचं..?
असे ठाणे काँग्रेसचा बॅनरवर सवाल pic.twitter.com/KN5FbSqPLY— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 31, 2020
वाशीममध्ये अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणी
यावर आता भाजपाने निशाणा साधला आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विटरद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ” ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला कोण विचारत नाही हे रोज समोर येत आहे. आता तर थेट काॅग्रेस पोस्टरबाजी करू लागली आहे.गांधीनी पाठिंबा दिला नसता तर ठाकरे सरकार, महाराष्ट्रात सत्तेवर आले असते का?सरकार तिघांचं नाव का फक्त दोघांचं..? असे ठाणे काँग्रेसचा बॅनरवर सवाल” असे ट्विट करत त्यांनी खरमरीत टीका केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

