वाशीम : धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकरवी अमानुष मारहाण करणार्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चाने आज २८ ऑगस्ट रोजी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी राज्याच्या विकासाचे पुरते वाटोळे करणार्या महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी करण्यात आली असून जिल्हाधिकार्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
धुळे जिल्ह्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते विविध मागण्यांचे निवेदन घेवून पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले होते. परंतु सत्तार यांनी निवेदन न स्विकारता सदर कार्यकर्ते व विद्यार्थ्यांना पोलिसांकरवी अमानुष मारहान केली. सदर घटनेचा निषेध नोंदवून सत्तारांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता युवा मोचार्ने आज स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी व भाजपा नेते तथा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजु पाटील राजे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष विजय पाटील काळे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन पार पडले. यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे, जिल्हा सोशल मीडीया संयोजक नाविन शर्मा, नगरसेवक भिमकुमार जिवनाणी, अमित मानकर, मगरूळनाथ तालुकाध्यक्ष रविंद्र ठाकरे , महामंत्री अनिल गावंडे, शहर महामंत्री गणेश खंडाळकर, संदिप काळे, सुरज चौधरी,प्रदिप देशमुख, कारंजा तालुकाध्यक्ष मंगेश धाने, शहराध्यक्ष अमोल गढवाले, विश्वास ब्रम्हेकर, प्रभाकर पदमने, पंकज गावंडे, राजू भगत, ज्ञानेश्वर भोयर, सुनिल कायंदे, सोपान गवळी आदी उपस्थित होत्या.
पुण्यात दिवसभरात १,६५८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ !


