Share

सामना अग्रलेख : भाजपाचा ‘घंटानाद’ धार्मिक कि राजकीय?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना रोगाच्या थैमानामुळे देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. यानंतर जून महिन्यात टाळेबंदीमध्ये काहीशी शिथिलता आणली गेली व त्यानंतर अनुक्रमे जुलै व ऑगस्टच्या सुरुवातीला जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आणखी शिथिलता आणली गेली. महाराष्ट्र राज्यात आता आंतरजिल्हाबंदी उठवण्यात आली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील सुरु करण्यात आली आहे.

मात्र, कोरोना संसर्गाचा अजूनही असलेला धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रार्थनास्थळांवरील बंदी कायम ठेवली आहे. केंद्र सरकारने काही अटी शर्थीवर मंदिरे सुरू करण्याची परवानगी दिलेली असताना राज्यसरकार मात्र परवानगी देत नसल्याच्या विरोधात शनिवारी राज्यभरात भाजपाने घंटानाद आंदोलन केले तर आज प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी व विश्व वारकरी सेनेतर्फे पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिर उघडण्यासाठी आक्रमक आंदोलन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून या आंदोलनांच्या उद्देशावरच टीका करण्यात आली आहे.

‘पवना’ धरण १०० टक्के भरले, मावळासह पिंपरी-चिंचवडकरांची चिंता मिटली!

सामना अग्रलेख :

लोकांना मनःशांती व पोटशांती हे दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून मिळायला हवी, पण कोरोनाचा स्फोट पुन्हा झालाच तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे काय? धार्मिक स्थळे उघडल्यानंतर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राबवायचे हे लोकांना कळते असे देवेंद्र फडणवीस सांगतात. पण भाजपतर्फे जे घंटानाद आंदोलन झाले त्याची छायाचित्रे पाहिल्यावर समजले या ‘डिस्टन्सिंग’ची कशी जोरदार काशी झाली आहे.

आघाडीत बिघाडी कायम! सरकार तिघांचं, मग नाव का फक्त दोघांचं? काँग्रेसची पोस्टरबाजी

त्यामुळे मंदिरे उघडण्याच्या प्रश्नी विरोधकांनी धसमुसळेपणा करण्याआधी महाराष्ट्राची स्थिती समजून घेतली पाहिजे. ज्या ‘मनःशांती’चा उद्घोष राज्याचे विरोधी पक्षनेते करतात त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत. आधी लोकांना जगवा, मग पुढचे पुढे!

भक्ती-शक्ती संगम: श्रीसमर्थस्थापित सहावा मारुती – मसूरचे मारुतीराय

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणण्याची प्रथा आहे, पणसध्याच्या काळात विरोधी पक्षांपुढे सत्तेचे शहाणपण चालत नाही, असे म्हणणे अधिक व्यावहारिक ठरेल. विरोधी पक्ष नावाचा प्राणी कधी कोणत्या प्रश्नी उधळेल ते सांगता येत नाही. महाराष्ट्रातील प्रबळ विरोधी पक्षाने काल सर्वत्र घंटानाद केला. कुठे थाळीनाद केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाचेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडा या मागणीसाठीच हा घंटानाद होता. विरोधी पक्षाचे हे आंदोलन नक्की धार्मिक होते की राजकीय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. भाजपाच्या पाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई मंदिर उघडण्याचे आंदोलन सुरू केले आहे. तिकडे संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार जलील मियांनी दोन सप्टेंबरनंतर मशिदीची टाळी उघडण्याची घोषणा केली आहे. जलील यांनी मशिदी उघडण्याची बांग दिली म्हणून भाजप पुढाऱ्य़ांनी राज्याच्या आरोग्याचा विचार न करता ‘घंटा’ वाजवणे हे बरे नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!