🕒 1 min read
ठाणे : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. गेले काही दिवस या महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. या तिन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये खटके उडत असून याचे परिणाम आगामी निवडणुकांवर होऊन त्याचे पडसाद राज्य पातळीवर देखील उमटू शकतात.
भाजपाला धक्त देत महायुतीमधून शिवसेना बाहेर पडली आणि सत्तेच्या गणिताचा मेळ बसवत शिवसेनेने, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. यानंतर मात्र, या आघाडीतील पक्षांमध्ये पहिल्या सहामाहीमध्येच अंतर्गत नाराजीचे सूर बाहेर येऊ लागले होते. विरोधी बाकावर बसलेल्या भाजपाने तर या सरकारवर निशाणा साधण्याची कोणतीही संधी न सोडता ‘हे सरकार फार काळ टिकणार नाही’, असा अंदाज लावला होता.
भक्ती-शक्ती संगम: श्रीसमर्थस्थापित सहावा मारुती – मसूरचे मारुतीराय
यानंतर, निधी वाटपातील दुजाभाव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या, महाजॉब्स पोर्टल प्रकरण अशा अनेक प्रकरणांवरून काँग्रेसची उघड नाराजी समोर येत असतानाच आता आणखी एका मुद्याची यात भर पडली असल्याने महाविकास आघाडीतील दुरावा वाढत जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
विदर्भात पूरग्रस्त भागासाठी चंद्रशेखर बावनकुळेंनी केली ‘ही’ मागणी
ठाकरे सरकारची वचनपूर्ती असा संदेश देणाऱ्या बॅनरच्या शेजारीच काँग्रेसने, ” सरकार तिघांचं, मग नाव का फक्त दोघांचं”, असा प्रश्न बॅनरच लावून विचारला आहे. “सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पाठिंबा दिला नसता तर जनकल्याण करणारे ठाकरे सरकार, महाराष्ट्रात सत्तेवर आले असते का?”असा थेट प्रश्न विचारून आपली नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी हा बॅनर लावलेला असून एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड या दोघांवर खरमरीत टीका देखील त्यांनी केली आहे.
काय आहे हे प्रकरण?
नुकत्याच मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत एम एम आर क्षेत्रात असलेल्या 8 महानगरपालिका आणि 7 नगरपालिका स्वतंत्र एस आर ए प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबई सोडून या महानगरपालिका मधील नागरिकांचे विनामूल्य घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण होईल, यासाठी आभार व्यक्त करणारा एक बॅनर स्लम डेव्हलपर्स आणि आर्किटेक्ट असोसिएशनने तीन हात नाक्यावर लावलाय.
या बॅनरवर “ठाकरे सरकारची वचनपूर्ती” असे म्हणत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबतच बॅनर वर स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे. यासंदर्भात एबीपी माझाने वृत्त दिले आहे.
काँग्रेस पदाधिकाऱ्याची जहरी टीका!
” ठाण्यातले हे दोन्ही मंत्री काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे झालेत त्याचा त्यांना कदाचित विसर पडला आहे. एकनाथ शिंदे गेल्यावर निखिल पालकमंत्री होते आणि आताही ते पालकमंत्री आहेत त्यांचे नशीब फळफळले आहे, त्याबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही. मात्र गेल्या वेळी ते ज्योती सरकारचे मंत्री होते आता आमच्या मेहरबानीवर ते मंत्री झाले त्याचा त्यांना विसर पडला आहे”, असे विक्रांत चव्हाण यांनी म्हटले आहे. “कालचे मुंगूस आणि साप एकत्र आले आहेत, आम्ही मात्र डोंबाऱ्याचा भूमिकेत आहोत, आम्ही मुंगुसाला आणि सापालही नाचवू शकतो”, असा घणाघात त्यांनी केला आहे. आता, काँग्रेस नेत्यांमधील नाराजी दिवसेंदिवस महाविकास आघाडीत दरी निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

