🕒 1 min read
नागपूर : मध्यप्रदेश आणि विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. मध्यप्रदेशात तर जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील धरणे भरून ओव्हरफ्लो सुरु झाले आहेत आणि जिल्ह्यातील पारशिवनी, सावनेर, रामटेक, कामठी, मौदा या तालुक्यांमधील काही गावांमध्ये पाणी शिरले आहे.
हजारो लोकांची घरे पाण्यात असून हजारो हेक्टरवरील शेतकर्यांची पिकेही पाण्याखाली गेली आहेत. महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त घरांचे सर्वेक्षण करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपाचे प्रदेश महासचिव व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
जिल्ह्यातील पेंच व तोतलाडोह या दोन्ही जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. याशिवाय पावसाचा जोर कायम असल्यामुळे पाणी जिल्ह्यातील गावांमध्ये घुसले आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी तालुका स्तरावरील लोक मदत करीत आहेत. पण ही मदत अत्यंत अपुरी आहे. पुरात अडकलेल्यांना वाचविण्यासाठी पुरेशा बोटी उपलब्ध होत नाहीत.
रिझर्व बँकेचे गव्हर्नर ‘शक्तिकांत दास’ यांचा देशातील बँकांना घरचा आहेर !
जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करावी व लोकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. काही गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. ड्रोनच्या माध्यमातून शासनाने याची माहिती करून घ्यावी व पूरग्रस्तांना बाहेर काढून त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
जायकवाडीची पाणी पातळी ८७ % ; गोदाकाठच्या १४ गावांना सतर्कतेचा इशारा…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

