Share

“सर्दी, ताप, खोकल्यावर डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर उपचार घेतल्याने वाढतोय कोरोनाचा संसर्ग”-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Published On: 

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कोरोना नियंत्रण बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सर्व यंत्रणांव्दारे कोरोना नियंत्रणाबाबत घेण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेत संबंधितांना निर्देशीत केलं.

लॉकडाऊन जस जसे शिथिल होत आहे तसा तसा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचप्रमाणे दवाखान्यात जाण्याच्या भीतीने शहरासह ग्रामीण भागात देखील नागरिकांनकडून कोरोना सदृश्य लक्षणां वर घरीच उपचार घेणे, मेडिकल्स मधून औषधे खरेदी करणे तसेच दुखणे अंगावर काढणे हे प्रकार वाढत असल्याने कोरोनाची संसर्ग साखळी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

रिझर्व बँकेचे गव्हर्नर ‘शक्तिकांत दास’ यांचा देशातील बँकांना घरचा आहेर !

या पार्श्वभूमीवर सर्दी, ताप, खोकला, श्वसनाचा त्रास या त्रासासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे औषधे खरेदी करणाऱ्यांची माहिती औषध विक्रेत्यांनी नियमितपणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे देण्या बाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना निर्देश दिले आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या शारीरिक त्रास दुखणे अंगावर काढू नये, तातडीने नजीकच्या डॉक्टरांना दाखवावे, असे आवाहन करत यंत्रणांनी याबाबत खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी दिले.

जायकवाडीची पाणी पातळी ८७ % ; गोदाकाठच्या १४ गावांना सतर्कतेचा इशारा…

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, महापालिका अतिरिक्त आयुक्त ब. भि. नेमाने, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, वर्षाराणी भोसले, संगीता चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, डॉ. विजयकुमार वाघ, डॉ. पी.एम. कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

शालिनी विखे व त्यांची नातवंडे बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!