नवी दिल्ली : अगोदरच देशाची कोलमडलेली आर्थिक स्थिती त्यानंतर कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था पूरती ढासळलेली आहे. त्यामुळे ही स्थिती सुधारायची असेल तर “बँकांनी सध्याच्या बिकट परिस्थितीत जोखीम उचलणे गरजेचे, ” असल्याचे मत रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केलं. ते एका इंग्रजी दैनिकाने आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये बोलत होते.
जायकवाडीची पाणी पातळी ८७ % ; गोदाकाठच्या १४ गावांना सतर्कतेचा इशारा…
कोरोनामुळे सध्या बँका आर्थिक स्थिती राखण्याचा प्रयत्न करीत आहेत. ग्राहकांना कर्ज पुरवठा होत नाही, अशाप्रकारे पतपुरवठा करण्यात हात आखडता घेऊन बँका आपला व्यवसाय कसा वाढवणार असा सवाल त्यांनी केला. तसेच पतपुरवठ्याची जोखीम उचलत बँकांचे व्यवस्थापन आणि प्रशासन सुधारण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडलं. जोखीम उचलली टाळणे म्हणजे आपल्या कार्यशैलीत घोर अभाव आणि स्वतःच्याच अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रकार असल्याचं दास यांनी यावेळी बँकांच्या व्यवस्थापनांना सुनावले.
शालिनी विखे व त्यांची नातवंडे बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

