वर्धा : पोथरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये वर्धा जिल्हा अतिशय मागे आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकल्पाची प्रगती पुढील एक महिन्यात समाधानकारक नसल्यास काम न करणार्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद सभागृहात आयोजित कृषी विषयक आढावा बैठकीत भुसे बोलत होते. या बैठकीला आमदार रणजित कांबळे, आमदार समीर कुणावर जिल्हाधिकारी विवेक भीमनवार व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
निरोगी जीवनासाठी राज्यातील ‘या’ मंत्री महोदयांनी दिला रानभाज्या खाण्याचा सल्ला
तळागाळातील शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी शासनाच्या अतिशय चांगल्या योजना असताना, या योजनेत वर्धा जिल्ह्यात फारसे समाधानकारक काम न झाल्याबद्दल कृषिमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
अधिकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, आपण स्वत: शेतकऱ्यांची मुले आहात शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली आहे. आपण केलेल्या कामावर आपण स्वत: समाधानी आहात का? याचा जरा विचार करा. शेतकऱ्यांकडे जाऊन संवाद साधणे, मार्गदर्शन करून त्यांच्या अडचणी सोडवणे हे कृषी विभागाचे खरे काम आहे. मात्र सध्या कृषी विभाग केवळ टारगेट ओरिएंटेड काम करत असल्याबद्दल त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
राष्ट्रवादीच्या आणखी एका युवा आमदाराला कोरोनाची लागण
पुढील चार वर्षात पोथरा प्रकल्प संपणार आहे. वर्धा जिल्ह्यात या योजनेचे मोठय़ा प्रमाणात काम करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. या प्रकल्पाला स्मार्ट योजनेची जोड दिल्यास मोठय़ा प्रमाणावर शेती प्रक्रिया उद्योग उभे राहतील आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनी नियोजनपूर्ण काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या प्रकल्पासंदर्भात गावातील शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया वाढवावी, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना यात प्रामुख्याने सामावून घ्यावे, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांच्याही नोंदणीवर भर द्याव आणि प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

