परभणी : परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी काल शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा पाठवत सर्वांनाच धक्का दिला आहे. तर, या राजीनाम्यासोबत त्यांनी एक पत्र देखील पाठवले असून त्यातून धक्कादायक आरोप त्यांनी केले होते.
जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळणाऱ्या वागणुकीवरून गौप्यस्फोट केला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळचेपी केली जात असल्याच्या आरोप केला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये परभणीत स्थानिक पातळीवरील असलेले मतभेद सर्वश्रुत आहेत.
तलाठी व कोतवालांनाही विम्याचे कवच आ.लंके यांच्या पत्राची मुख्यमंत्र्यांकडून दखल
शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत निर्माण झालेली धुसफूस हि एवढ्यावरच थांबलेली नसल्याचे दिसत आहे. काल रात्री परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर काही अज्ञात व्यक्तींनी तुफान दगडफेक केली. दरम्यान, राष्ट्रवादीने हा हल्ला शिवसैनिकांनीच केल्याचा आरोप केला आहे.
कोल्हापूरात आता ‘आमचं ठरलंय’ नावाचा पक्ष?
काल रात्री साडेदहाच्या सुमारास हा हल्ला झाल्याचे समजत आहे. या दगडफेकीमुळे कार्यालयाच्या काचांचे तसेच इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून आता हा वाद वाढणार कि वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने मिटणार हे महत्वाचं मानलं जात आहे.
अभाविपच्या आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जची चौकशी करू : अब्दुल सत्तार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

