🕒 1 min read
कोल्हापूर : कोल्हापुरातील राजकारण हे कायमच रंजक राहील असून जिल्ह्याने अनेक मंत्री देखील दिले आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये मंत्री सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन लोकसभा उमेदवार माजी खासदार धनंजय महाडीक यांच्यातील शत्रुता पुन्हा समोर आली होती.
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असलेला आघाडी धर्म मोडीत काढून सतेज पाटील यांनी, ‘आमचं ठरलंय’ असं म्हणत महायुतीच्या शिवसेनेचे उमेदवार असलेल्या संजय मंडलिक यांना पाठिंबा दिला होता. तर, मंडलिक यांनी परतफेड म्हणून विधानसभेवेळी महायुतीतर्फे भाजपाच्या उमेदवाराऐवजी सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना दक्षिण कोल्हापुर विधानसभा निवडणुकीत मदत केली होती, तसेच शिवसेनेत येण्याचे आमंत्रण देखील दिले होते.
अभाविपच्या आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जची चौकशी करू : अब्दुल सत्तार
कोल्हापूरचा ‘आमचं ठरलंय’ पॅटर्न महाराष्ट्रभर गाजला होता. आता हा पॅटर्न पक्ष म्हणूनच अस्तित्व निर्माण करत आहे. “आमचं ठरलंय विकास आघाडी” ला निवडणूक आयोगाने देखील मान्यता दिली असून कोल्हापुरातील स्थानिक निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका हा पक्ष घेऊ शकतो. या पक्षाला राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आदी निवडणुका लढवता येणार आहेत.
गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे खंदे समर्थक मानले जाणारे प्रमोद पाटील हे ‘आमचं ठरलंय विकास आघाडी’चे प्रमुख आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा ‘आमचं ठरलंय’ हे वाक्य चर्चेत आलं असून येत्या काळात राजकीय दृष्ट्या किती महत्व हा पक्ष प्राप्त करणार हे कोल्हापूरसाठी महत्वाचं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

