नागपूर : बुलडाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे आपला राजकीय पुनर्वसन करण्याच्या तैयारीत असून त्यांनी भाजपची वाट धरली आहे. आज त्यांनी मुंबई येथे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश घेतला.
जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदार संघातून तब्बल तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले विजयराज शिंदे यांचे शिवसेना पक्षवाढीत मोठे योगदान आहे. शिवसेनेचे शाखाप्रमुख ते आमदार, जिल्हा प्रमुख असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचा विजयरथ रोखला होता. शिवसेनेचे बुलडाणा खासदार प्रतापराव जाधव व विजयराज शिंदे यांच्यामध्ये मध्यंतरीच्या काळात मतभेद निर्माण झाले होते. त्यांचा संघर्ष पराकोटीला गेला होता. परिणामी शिंदे यांचे २०१९ च्य निवडणुकीत तिकीट कापण्यास प्रतापराव जाधव यशस्वी झाले होते. विजयराज शिंदे कट्टर राजकीय विरोधक संजय गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिकीट कापल्याने विजयराज शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर बुलडाणा विधानसभा मतदार संघातुन निवडणूक लढवत दुसर्या क्रमांकाची मते घेतली मात्र त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी संजय गायकवाड आमदार झाले.
आता आपले राजकीय पुनर्वसन व्हावे म्हणून विजयराज शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. मुंबई येथे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित त्यांचा प्रवेश सोहळा झाला.
महत्वाच्या बातम्या :
मोठी बातमी: काँग्रेसचे नाराज आमदार थेट अजित पवारांच्या भेटीला!
‘जितना चाहा उतनी मोहोब्बत नहीं मिली’ ; काँग्रेसचे नाराज आमदार कैलास गोरंट्याल
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतले संघदर्शन, प्रथमच नागपूर दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
